काळजी वाढली: बार्शीत सोमवारी 61 बाधित रूग्णाची वाढ; एकूण रुग्णसंख्या 1070 वर

0
391

बार्शी तालुक्यात कोरोना बाधिताची संख्या थांबता थांबेना !

काळजी वाढली: बार्शीत सोमवारी ६१ बाधित रूग्णाची वाढ; एकूण रुग्णसंख्या १०७१ वर

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

बार्शी : बार्शीशहरासह तालुक्यातील कोरोनाचा विळखा वाढत असुन बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे सोमवार दि ३ ऑगस्ट रोजी आलेल्या रिपोर्ट मध्ये ६१ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली . यात ३६ रुग्ण हे बार्शी शहरामधील आहेत तर ग्रामिणमध्ये २५पॉझिटिव्ह रुग्ण आहेत त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १०७१ वर पोहचली आहे.

बार्शी तालुक्यात कोरानाचा वाढता प्रादुर्भावामुळे  दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत आहे. बार्शी शहरातील विविध भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे प्रशासनाला बार्शीसह तालुक्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यास अपयश आले आहे .

तर एकीकडे बार्शी शहरात रुग्ण संख्या वाढत असताना सोशल डिस्टनचे नियमांना फाटा देत अनेक दुकानात मोठ्या प्रमाणात नागरीकांची खरेदी साठी गर्दी वाढली आहे. 

आज आलेल्या २८४ अहवाला पैकी ६१ रुग्ण कोरोना बाधित सापडले आहेत तर २२३ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

 ६१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णापैकी बार्शी शहरातील राजन मिल सोलापुर रोड ५ ,झाडबुके मैदान २ ,लहुजी चौक २ ,टिळक चौक ३, सुभाषनगर २, दत्तनगर १, जैन मंदीर अलिपुर रोड १, स्वयंवर मंगल कार्यालयजवळ १, लातूर रोड १, उपळाई रोड १, भोगेश्वरी मंदीर जवळ १ ,एकविराई मंदीर जवळ २ ,नाईकवाडी प्लॉट १, भिसे प्लॉट १, फुले प्लॉट ६, वाणी प्लॉट १, वायकुळे प्लॉट १, पाटील प्लॉट १, रामभाऊ पवार चौक १, गाडेगावरोड २ असे एकुण ३६ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे .

तर ग्रामिणमध्ये वैरागमध्ये ही बाधितांची वाढ होत असुन आजच्या अहवालात १२ रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत तर आगळगाव ४ ,चिंचोली १ ,रातंजन १, लाडोळे २, जवळगाव २, बोरगाव झाडी १, उपळे दु १, खामगाव १ असे २५ बाधित रुग्णांची वाढ झाली आहे.

असा शहर व ग्रामीण मिळुन ६१ रुग्णाची भर पडुन आता एकुण रुग्ण संख्या १०७१ पोहचल्याने खळबळ उडाली आहे . सदया ४८७ रुग्णांवर उपचार सुरु असुन ५४५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे तर कंटनमेंटची संख्या वाढुन १९६ वर पोहचली आहे .

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here