सुश्रुत हॉस्पिटलच्या व्यवस्थापकास धमकावून तीस लाख रुपये मागितल्याची तक्रार

0
143

बार्शी : येथील सुश्रुत हॉस्पिटलच्या व्यवस्थापकास धमकावून, डॉ. संजय अंधारे यांना तीस लाख रुपये देण्यास सांग अन्यथा हॉस्पिटलची बदनामी करेन, हॉस्पिटलमध्ये जाळपोळ घडवून आणेन अशी धमकी दिल्याची तक्रार बार्शी पोलिसांत दाखल झाली आहे.

डॉ. संजय अंधारे यांच्या सुश्रुत हॉस्पिटलमध्ये व्यवस्थापक म्हणून काम पहाणारे अजित अंबऋषी अंधारे (वय ३८) रा. उपळाई रोड, बार्शी यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार,

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा


दि. २० एप्रिल रोजी दुपारी तीनचे सुमारास मी उपळाई रोडने ओम हॉटेलकडून सुश्रुत हॉस्पिटलकडे मोटरसायकलवरुन जात असताना, पोलिस ग्राउंडजवळ संदिप सुतार व सचिन सुतार (दोघेही रा. उपळाई रोड, गोंदिल प्लॉट, बार्शी) यांनी पाठीमागून येऊन, माझ्या मोटरसायकलला त्यांची मोटरसायकल आडवी लावून मला थांबवून, संदिप सुतार याने माझी कॉलर पकडून शिवीगाळी केली.

तू माझा भाऊ सचिन विरुध्द सीसीटीव्ही फुटेज चोरले म्हणून तक्रार करतो काय, डॉ. संजय अंधारेला आमच्याविरुध्द कोर्टात दाखल केलेला अब्रुनुकसानीचा दावा मागे घ्यायला सांग.

तसेच डॉ. संजय अंधारेला दोन दिवसात आम्हाला तीस लाख रुपये द्यायला सांग, अन्यथा माझ्या आईला हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान डॉ. संजय अंधारे याने व तू जीवे ठार मारले म्हणून तुमच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करुन, तुम्हा दोघांना आयुष्यभर जेलमध्ये सडवू अशी भिती घातली.

तसेच आमचेकडे सुश्रुत हॉस्पिटल मधील असलेले सर्व रेकॉर्ड सार्वजनिक करुन हॉस्पिटलची बदनामी करेन. हॉस्पिटल मधील पेशंटना तुमच्याविरुध्द भडकावून तुमच्या हॉस्पिटलमध्ये जाळपोळ घडवून आणेन.

डॉ. संजय अंधारे व सुश्रुत हॉस्पिटलविरुध्द पेशंटना भडकावून त्यांना आमरण उपोषण तसेच आत्मदहन करायला लावीन, जसे उज्वला मिरगणे हीस भडकावले होते.


तसेच माझ्या आईवर केलेल्या उपचाराच्या सर्व कागदपत्रांवर हॉस्पिटलचा शिक्का मारुन ती आम्हाला द्यायची, अशी धमकी दिली व सचिन सुतार व संदिप सुतार यांनी माझ्या कानाखाली चापटा मारल्या. आजच्या आज पैशांची व्यवस्था कर अन्यथा होणाऱ्या परिणामांना सामोरे जा अशी भिती घालून निघून गेले.

घटनेची पार्श्वभूमी

यातील सचिन चतुर्भुज सुतार हा पूर्वी सुश्रुत हॉस्पिटलमध्ये सीसीटीव्ही, कॉम्प्युटर, प्रिंटर, इंटरकॉमच्या देखभाल दुरुस्तीचे कामासाठी होता. पुढे त्याच्याविरुध्दच्या काही तक्रारीमुळे दि. २८ फेब्रुवारी २०२१ पासून हॉस्पिटल प्रशासनाने त्याचेकडून काम काढून घेतले होते. त्याचे वडिल चतुर्भुज सुतार व डॉ. संजय अंधारे यांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याने चतुर्भुज सुतार यांनी त्यास पुन्हा ते काम सचिनकडे देण्याची विनंती केली होती. त्यामुळे डॉ. संजय अंधारे यांनी त्यास पुन्हा ते काम दिले होते. तेव्हापासून सचिनकडे सीसीटीव्हीचे अॅक्सेस, तसेच संगणकाचे पासवर्ड होते.

दि. १५ एप्रिल २०२१ रोजी सचिनची आई आशा चतुर्भुज सुतार यांना कोरोना संसर्ग झाल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करुन घेतले होते. दि. १ मे २०२१ रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला होता.

मृत्युनंतर सुमारे एक महिन्यानंतर सचिन सुतार व संदिप सुतार यांनी हॉस्पिटल प्रशासनाविरुध्द व डॉ. संजय अंधारे यांच्याविरुध्द समाजमाध्यमावर बदनामीकारक वक्तव्ये केली. तसेच सिव्हिल हॉस्पिटल, सोलापूर, पोलिस महासंचालक, पोलिस अधिक्षक सोलापूर, उपविभागीय अधिकारी, बार्शी यांचेकडे तक्रारी अर्ज केले होते.

सदर तक्रारीबाबत झालेल्या चौकशीमध्ये डॉ. संजय अंधारे यांनी व हॉस्पिटल प्रशासनाने त्यांच्या आईवर केलेले औषधोपचार बरोबर व योग्य असल्याचे नमूद करुन तक्रारी अर्ज निकाली काढले होते.

तरीही संदिप व सचिन सुतार यांनी डॉ. संजय अंधारे व हॉस्पिटल प्रशासनाची बदनामी करणे चालूच ठेवल्याने डॉ. संजय अंधारे यांनी संदिप सुतार याच्याविरुध्द बार्शी न्यायालयात मानहानीचा दावा केलेला आहे.

हॉस्पिटल प्रशासनाने हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही फुटेज सचिन सुतार याने चोरल्याची तक्रार पोलिसात दिली होती.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here