दिलासादायक: सोलापूर शहरात कोरोना कमी होऊ लागला; 34 अहवाल पॉझिटिव्ह, तिघांचा मृत्यू

0
299

सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज शनिवारी दुपारी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री 12 पर्यंत 523 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी 489 अहवाल निगेटिव्ह आले असून 34 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात 16 पुरुष तर 18 महिलांचा समावेश असल्याची माहिती सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.आज 114 बाधित व्यक्ती बऱ्या होऊन घरी गेल्या आहेत.

ज्या वेगाने सोलापूर शहर आणि परिसर ग्रीन झोन मधून रेड झोन कडे गेले ,त्याच गतीने नसले तरी हळूहळू कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे.मागील पाच ते सहा दिवसात दिवसागणिक बरे होण्याचे प्रमाण वृद्धिंगत होत आहे तर मृत्यु प्रमाण कमी होत असल्याचे दिसत आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

आज 3 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.आज पर्यंत एकूण 376 जणांचा बळी या आजाराने गेला आहे. यामध्ये 250 पुरुष तर 126 महिलांचा समावेश होतो.

आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 5368 इतकी झाली आहे, तर आजपर्यंत एकूण 376 जणांचा मृत्यू झाला आहे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1148 इतकी आहे, तर रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 3844 इतकी लक्षणीय आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here