आ. शहाजीबापू  पाटील ही एकनाथ शिंदेंसोबत ? रात्रीपासून नॉट रिचेबल

0
102

आ. शहाजीबापू  पाटील ही एकनाथ शिंदेंसोबत ? रात्रीपासून नॉट रिचेबल –


शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह १३ आमदार रात्रीपासून नॉट रिचेबल आहेत. त्यामध्ये आपल्या सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील हेसुद्धा संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याच्या बातम्या पुढे येत आहेत. शहाजीबापू भूकंप करणार का? अशी चर्चा सुरू आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

दरम्यान, आज दुपारी बारा वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषद घेणार आहेत. त्याच पार्श्वभुमीवर सुरत येथे मंत्री एकनाथ शिंदे हे सुध्दा दुपारी दोन वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती आहे.

शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक, सांगोला मतदारसंघाचे आमदार शहाजीबापू पाटील यांचा फोन काल रात्रीपासून बंद लागत आहे. जवळच्या सहकाऱ्यांनादेखील आमदार शहाजीबापू पाटील कुठे आहेत हे माहित नाही अशी माहिती पुढे येत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचे सहाही आमदार न रीचेबल आहेत. उदयसिंह राजपूत, संजय शिरसाठ, रमेश बोरणारे, प्रदीप जैस्वाल, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे हे सहा आमदार नॉट रीचेबल असल्याचे सांगण्यात येत आहे. सेनेचे सहाही आमदार औरंगाबाद जिल्ह्यात नसल्याची माहिती आहे.


बापूंची नाराजी लपली नाही
आमदार शहाजीबापू पाटील हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते आहेत. त्यांनी एकवेळेस शेकापचे ज्येष्ठ नेते भाई गणपतराव देशमुख यांचा पराभव करून विजय प्राप्त केला होता. मात्र दुर्दैवाने त्यावेळेस शिवसेना – भाजपचे सरकार आले आणि त्यांची मंत्री पदाची संधी गेली.

काही वर्षांपूर्वी आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. भाई गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांचा पराभव करून ते आमदार बनले. आता आपण आमदार झालो, राज्यात शिवसेना सत्तेत आहे, शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे म्हटल्यावर आमदार शहाजीबापू पाटील यांना आपण मंत्री होणार असल्याची खात्री मिळाली. मात्र याही वेळी त्यांच्या पदरी निराशा पडली.


आमदार शहाजीबापू पाटील यांनी अनेकदा ही नाराजी बोलून दाखविली. पंढरपूर येथे बी.पी. रोंगे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात आमदार शहाजीबापू पाटील यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. आपला पक्ष सत्तेत असूनही आपल्याला काहीच किंमत मिळत नाही. विकासकामांसाठी निधी मिळत नाही. आपल्याला दूर लोटले जाते.

मी आमदार होण्यामागे भाजपची मोठी मदत मिळाली असल्याचा दावा त्यांनी त्या कार्यक्रमात केला होता.

सोमवारी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत आमदार शहाजीबापू पाटील हे मुंबईत होते. मात्र काल रात्रीपासून ते संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत.


शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक, सांगोला मतदारसंघाचे आमदार शहाजीबापू पाटील यांचा फोन काल रात्रीपासून बंद लागत आहे. जवळच्या सहकाऱ्यांनादेखील आमदार शहाजीबापू पाटील कुठे आहेत हे माहित नाही अशी माहिती पुढे येत आहे.

आमदार शहाजीबापू पाटील हे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरत येथे असल्याच्या बातम्या वृत्त वाहिन्यांवर दाखविल्या जात आहेत. त्यामुळे आगामी काळात आमदार शहाजीबापू पाटील हे भूकंप करणार का? अशा चर्चांना ऊत आला आहे.

एकनाथ शिंदेंसह नॉट रिचेबल आमदारांची यादी

1. शहाजी बापू पाटील

2. महेश शिंदे सातारा

3. भरत गोगावले

4. महेंद्र दळवी

5. महेश थोरवे

6. विश्वनाथ भोईर

7. संजय राठोड

8. संदीपान भुमरे

9. उदयसिंह राजपूत

10. संजय शिरसाठ

11. रमेश बोरणारे

12. प्रदीप जैस्वाल

13. अब्दुल सत्तार

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here