मुख्यमंत्र्याच्या मुलाखतीचा ट्रेलर: मी ट्रम्प नाही त्यामुळे माझ्या माणसाची तळमळ पाहू शकत नाही – मुख्यमंत्री
“मी ड्रोनाल्ड ट्रम नाही माझ्या माणसांची तळमळ पाहू शकत नाही असे भावनिक उदगार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार संजय राऊत यांनी लॉकडाऊन विषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले आहेत.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक, खासदार संजय राऊत यांनी मुलाखत घेतली ही मुलाखत येत्या शनिवारी आणि रविवारी अशा दोन दिवसात प्रसार माध्यमांवर दाखवण्यात येणार आहे. तत्पूर्वी या मुलाखतीचा ट्रेलर सामनाच्या अधिकृत ट्विटरवरून प्रसिद्ध करण्यात आला आहे.
मुंबईच्या रस्त्यावर वडापाव कधी मिळणार, या प्रश्नाचे उत्तरही त्यांनी दिले आहे. ‘लॉकडाऊन आहेच. त्यामुळंच ह्याच्यानंतर काय होणार, त्याच्यानंतर काय मिळणार याला अर्थ नाही.
आपण एकेक गोष्ट सोडवत चाललो आहेत असे त्यांनी या मुलाखतीत म्हंटले आहे. ‘सरकार म्हणून मी काही गोष्टी जरूर करणार. मला एखादी गोष्ट पटली तर ती करताना मी टीकेची पर्वा कधीच करत नाही. असेही त्यांनी म्हटलं आहे.