मोहोळमध्ये ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लिपिकास अटक

0
672

मोहोळमध्ये ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कार्यालयात लिपिकास अटक

सोलापूर (प्रतिनिधी) मोहोळ येथे चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना एका लिपिकास अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.अकबर हनीफ शेख प्रतिलिपीक,भूमी लेखापाल कार्यालय मोहोळ,जि.सोलापूर असे अटक करण्यात आलेल्या लिपिकाचे नाव आहे.ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

याबाबत अधिक माहिती अशी की,तक्रार दाराकडून शेतजमिनीची मोजणी करून त्या मोजणीचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यासाठी दोन्ही गटासाठी दहा हजार रुपये लाचेची मागणी करत असलेली तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर येथे आली.या तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पडताळणी केली असता, त्यामध्ये शेख याने दहा हजार रुपयेची लाचेची मागणी करून पहिला हप्ता चार हजार रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले.

दरम्यान याची खात्रीशीर माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आल्यानंतर मंगळवारी भूमी अभिलेख कार्यालय मोहोळ येथे सापळा लावण्यात आला.त्यावेळी शेख हा चार हजार रुपये लाच स्वीकारत असताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले.

ही कारवाई पोलीस उपायुक्त/अधीक्षक राजेश बनसोडे अप्पर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो पुणे संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली,सहाय्यक पोलीस आयुक्त संजीव पाटील पोलीस निरीक्षक जगदीश भोपळे, चंद्रकांत पवार,प्रमोद पकाले,श्याम सुरवसे यांनी पार पाडली.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here