पानटपरी अंगावर पडून बार्शीत चिमुकलीचा मृत्यू

0
322

बार्शी : बार्शी-कुर्दुवाडी रस्त्यावर मध्यवर्ती भागात असलेल्या रामेश्वर मंदिराजवळ पत्र्याची पानटपरी अंगावर कोसळून झालेल्या अपघातात लहान चिमुकलीचा मृत्यू झाला तर तिची मैत्रिण जखमी झाली आहे.

जखमींवर जगदाळे मामा रुग्णालयात उपचार सुरु असून बार्शी शहर पोलिसांत नोंद झाली आहे. ईश्वरी नवनाथ चव्हाण (वय ७, रा. रामेश्वर मंदिर जवळ) असे मृत्यू पावलेल्या चिमुकलीचे नाव आहे. जगदाळे मामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. देशमुख यांनी पोलिसांत घटनेबाबत माहिती दिली. ही घटना गुरुवारी सकाळी अकराच्या दरम्यान घडली.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

रामेश्वर मंदिराजवळ राहणारी ईश्वरी व तिची मैत्रिण पानटपरीला कपडे वाळत घालण्यासाठी बांधलेल्या दोरीला झोका म्हणून खेळत होत्या. हेलकाव्यामुळे पानटपरी पलटी झाली अन् टपरीखाली दोघी सापडल्या. घटना घडताच शेजाऱ्यांनी लगेच टपरी बाजूला करुन दोघींना उपचारासाठी जगदाळे मामा रुग्णालयात दाखल केले.

पण ईश्वरीला डोक्याला मार जास्त लागल्याने उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. पानटपरी मागील चार वर्षांपासून बंद अवस्थेत असल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले. अचानक झालेल्या अपघातात चिमुकलीला प्राण गमवावा लागल्याने परिसरात शोककळा पसरली होती. तपास हवालदार हर्षवर्धन वाघमोडे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here