बालकांच्या अंत्यसंस्काराचे साहित्य देतात मोफत; ३ वर्षांपासून सुरू आहे ‘मानवसेवा ‘

0
204

बालकांच्या अंत्यसंस्काराचे साहित्य देतात मोफत ;कोडम यांनी जपली सामाजिक बांधिलकी

  • ३ वर्षांपासून सुरू आहे ‘मानवसेवा ‘

सोलापूर –  मृत्यूच्या कवेत विसाविलेल्या व्यक्तीची परत कधीच भेठगाठ होणे शक्य नाही. त्यामुळेच मृत्यू हा वेदनादायी अन् दुख:द असतो. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांमध्ये मोठ्या प्रमाणात दुख: असते. अशा वेळी कुटुंबाला मदत करणारा हात लाखमोलाचा ठरतो. सोलापुरातील वेणुगोपाल कोडम अशाच लोकांच्या दुःखद प्रसंगात मदत करतात. जनसेवेच्या भावनेतून पाच वर्षांच्या आतील बालकांच्या अंत्यसंस्काराचे साहित्य ते मोफत देतात.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

अक्कलकोट रोड परिसरात पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या शांतीधाम स्मशानभूमीत वेणूगोपाल कोडम यांचे ‘अोम नम शिवाय’ नावाचे अंत्यविधी साहित्य विक्रीचे दुकान आहे. ते गेल्या ३ वर्षांपासून पाच वर्षांच्या आतील बालकांच्या अंत्यसंस्काराचे सर्व साहित्य मोफत देतात. अातापर्यंत त्यांनी 263 जणांच्या अंत्यविधी मोफत साहित्य पुरवले आहे. लॉकडाऊनच्या काळातही त्यांनी ९ बालकांच्या अंत्यविधीचे साहित्य मोफत दिले.

निधन झालेलं बालक श्रीमंत असो वा गरीब ते पैसे घेत नाहीत. ‘मानवसेवा’चे त्यांचे हे कार्य थक्क करणारे आहे. एका डोळ्याने दिव्यांग असलेल्या वेणुगोपाळ यांची ही असामान्य सेवा पाहून अनेकांच्या दु:खाची धार थोडी बोथट होते आणि आपले दु:ख बाजूला ठेवून लोक त्यांच्या कार्याची प्रशंसा करतात. कोणत्याही मृताचा अंत्यविधी सन्मानपूर्वकच झाला पाहिजे या हेतूने त्यांची स्मशानसेवा नियमितपणे सुरू असते. त्यांची ही सेवाभक्ती पाहून आतापर्यंत त्यांना काही पुरस्कार देखील मिळाले आहेत.

कोरोनाचे संकट अचानक विश्वासमोर असल्याने सर्व कामकाज ठप्प झाले आहे. या विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरु असल्याने नागरिक कुटुंबासहीत घरातच आहेत. यामुळे हातावर पोट असणाऱ्या अनेक नागरिकांना उपजिविका भागविणे देखील अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत कुटुंबातील एखाद्या प्रौढ व्यक्तीचा नैसर्गीक मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी लागणारा खर्च करण्यासाठी घरात पैसेच नाहीत, अशी परिस्थिती अनेक ठिकाणी निर्माण झाली आहे. यावेळी अंत्यविधीचे साहित्य माफक दरात दिल्याचे वेणूगोपाल कोडम यांनी दैनिक सुराज्य शी बोलताना सांगितले.

चौकट

असामान्य कार्याला सलाम!

गोरगरिबांना महागाईच्या काळात मरणही महाग झाले असताना जनसेवेच्या भावनेतून प्रौढ व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी लागणारे साहित्य ते नफ ना तोटा या या तत्त्वावर देतात.  सरपण, कापड यासह सर्व साहित्य माफक दरात देतात. त्यांच्या असामान्य कार्याला सलाम!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here