मराठा आरक्षण टिकून राहावे म्हणून मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक…!
कोर्टात मराठा आरक्षण टिकून राहावे म्हणून खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऍक्टिव-मोड मध्ये आले आहे. यासाठी आज त्यांनी मराठा उपसमितीची बैठक आयोजित केली होती. ही बैठक त्यांच्या शासकीय निवासस्थानी अर्थात “वर्षा” या बंगल्यावर पार पडली.


मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात वैध ठरावे यासाठी राज्य सरकारकडून प्रतिष्ठित वकिलांची फौज या कामासाठी नियुक्त करण्यात आली आहे. याशिवाय मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मंत्रिमंडाळातील नेत्यांची उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. मंत्री अशोक चव्हाण हे या समितीचे अध्यक्ष आहेत. तर मंत्री एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील हे या समितीचे सदस्य आहेत.

मराठा आरक्षणाबाबत २७ जुलैपासून सर्वोच्च न्यायालयात नियमित सुनावणी होणार आहे. कालसर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या अंतरिम आदेशावर सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने तूर्तास कोणताही अंतरिम आदेश किंवा वैद्यकीय प्रवेश प्रकियेला स्थगिती दिलेली नाही. ही एक दिलासायक बाब असल्याची प्रतिक्रिया काल अशोक चव्हाण यांनी दिली होती