छत्रपती उदयनराजेंनी यापुढे दक्षता घ्यावी, सभापतींनी दिली समज….!

0
395

छत्रपती उदयनराजेंनी यापुढे दक्षता घ्यावी, सभापतींनी दिली समज….!

आज सकाळी आकारा वाजता राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनात नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी संभारंभ सोहळा पार पडला. सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यामुळे मोजक्याच सदस्यांना शपथ देण्यात आली.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

या सोहळयाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (राष्ट्रवादी), केंद्रीय मंत्री रामदास आठवले (रिपाई), छत्रपती उदयनराजे भोसले (भाजपा) , प्रियांका चतुर्वेदी (शिवसेना), राजीव सातव (काँग्रेस), फौजिया खान (राष्ट्रवादी) आणि भागवत कराड (भाजपा) यांचा शपथीविधी सोहळा पार पडला.

छत्रपती उदयनराजे भोसले यांनी इंग्रजी मधून शपथ घेतल्यानंतर त्यांनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी…जय शिवाजी’ असा जयघोष करत शपथ पूर्ण केली. उदयनराजेंनी शपथ घेताना दिलेल्या घोषणेवरून सभापती व्यंकय्या नायडू यांनी त्यांना यापुढे दक्षता घ्या, असा सल्ला दिला.

व्यंकय्या नायडू म्हणाले, ‘हा शपथविधी सोहळा राज्यसभेत होत नाही. त्यामुळे पटलावर रेकॉर्ड होणार नाही. हा शपथविधी माझ्या दालनात होत आहे. त्यामुळे नवनिर्वाचित सदस्य उदयनराजेंनी याबद्दल पुढे दक्षता घ्यावी.’

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here