अभूतपूर्व ओवाळणी देऊन आयुष व्यसनमुक्ती केंद्रामध्ये रक्षाबंधन साजरा
बार्शी: आयुष्य समजते केंद्रामध्ये उपचार घेत असलेल्या सर्व रुग्णांना रक्षाबंधनच्या सणामध्ये बहिणीची कमतरता भासू नये म्हणून आयुष व्यसनमुक्ती केंद्र तील सर्व महिला कर्मचाऱ्यांनी सर्व रुग्णांना राखी बांधून रक्षाबंधन कार्यक्रम साजरा केला.

सर्व रुग्णांनी ओवळणी म्हणून इथून पुढचे आयुष्य निर्व्यसनी शांततेचे व सर्वांचा आदर करण्याचे वेचन दिले.

या कार्यक्रमाचे आयोजनाची संकल्पना केंद्राच्या प्रकल्प अधिकारी कविता अंधारे यांनी केली. व केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी ती अमलात आणली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. संदीप तांबारे उपस्थित होते. अंधारे मॅडम यांनी राखीच्या सणाचे महत्त्व सांगत रक्षाबंधनाची प्रथा कशी सुरू झाली याविषयी मार्गदर्शन केले.
डॉ. संदीप तांबारे यांनी शिवरायांनी शत्रूच्या स्त्रीयांना सुद्धा आपली बहीण मानून त्याना इज्जत देणे अशी उच्च दर्जाची शिकवण आपणही आत्मसात करावी असे विचार मांडले.
सूत्रसंचालन अश्विनी डिसले यांनी केले यशस्वीतेसाठी आयुष व्यसनमुक्ती केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.