मोहोळ :- शेतातील ऊसामध्ये गांजा लागवड केल्यामुळे कामती पोलीसांनी मोहोळ तालुक्यातील वटवटे या गावातील एका शेतकऱ्यावर कारवाई केली आहे. कारवाईत 4.13 किलो वजनाचे एकूण 4 लाख 41 हजार 300 रुपयाची गांजाची वनस्पती जप्त केली आहे.

मोहोळ तालुक्यातील वटवटे या गावातील सदाशिव दत्तू ढोबळे (वय.62) या शेतकऱ्याने उसाच्या शेतामध्ये गांजाची लागवड केली आहे. अशी माहिती गोपनीय बातमीदार मार्फत कामती पोलिसांना मिळाली. कामती पोलिसांनी वरिष्ठांशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. वरिष्ठांचे आदेश प्राप्त झाल्यानंतर सपोनि अनिल सनगल्ले व त्यांचे पथक कारवाई करणेकामी कामती पोलीस ठाणे येथे जावून तेथील सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने व कामती पोलीस ठाणेचे पोलीस अंमलदार यांची मदत घेवून नायब तहसिलदार लिना खरात, दोन शासकीय पंच, फोटोग्राफर, वजनकाटा ई. साहित्यासह घटनास्थळी दाखल झाले.

उऊसाच्या पिकामध्ये पाहणी केली असता गांजासदृश वनस्पती आढळून आल्या. हे वनस्पतींच्या असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी सदरची वनस्पती मुळासकट उपटून टाकली. वजन केले असता 45.130 किलो वजनाचे 4,41,300 रू. किंमतीचे गांजा सदृश्य वनस्पती मिळून आले. तो सर्व माल पोलिसांनी जप्त केला. तसेच याबाबत संबंधित शेतकऱ्यावर कामती पोलीस ठाणे येथे गुरंन 195/2022, अंमली पदार्थ व मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सदर गुन्हयाचा तपास कामती पोलीस ठाणेचे सपोनि अंकुश माने हे करीत आहेत.