फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या 12 वी परीक्षेचा निकाल उद्या लागणार आहे. याची घोषणा राज्य उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने केली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या 12 वीच्या परीक्षेचा निकाल उद्या, 16 जुलै 2020 रोजी जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजता मंडळाच्या अधिकृत वेबसाईट्सवर हा निकाल विद्यार्थी-पालकांना पाहता येईल. याबाबतची अधिकृत माहिती नुकतीच देण्यात आली आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर बारावीचा निकाल पाहता येणार आहे.

याबाबत नुकतीचं अधिकृत माहिती आता देण्यात आली आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने गेले अनेक दिवस १२वीच्या विद्यार्थ्यांचं लक्ष या निकालाकडे लागून राहिलं होतं. अखेर बोर्डाने आज निकालाचा दिवस जाहीर केला आहे.
या लिंकवर निकाल पाहता येईल…
www.maharesult.nic.in
www.hscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com