भारतीय जनता पक्षाचे पंढरपूर शहराध्यक्ष आणि दै निर्भीड आपलं मत चे संपादक संजय अंबादास वाईकर ( वय 52 वर्षे ) यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्यावर सोलापूर येथे उपचार सुरू होते.

संजय वाईकर यांना 10 दिवसांपूर्वी कोरोना झाल्याचा अहवाल आला होता. त्यांच्यावर वाखरी येथील कोविड केअर सेंटर येथे उपचार सुरू केले होते. मात्र त्यांची प्रकृती खालावली गेल्याने सोलापूर येथे खाजगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी हलवण्यात आले होते. तिथे रक्तदाब आणि शुगरचे प्रमाण खालावल्याने सोमवारी पहाटे त्यांचे निधन झाले.


संजय वाईकर यांनी साप्ताहिक आपलं मत, दै प्रभात, दै निर्भीड आपलं च्या माध्यमातून सुमारे 15 वर्षे पत्रकारिता केली. मागील 3 वर्षांपासून ते भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष म्हणून कार्यरत होते.त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी आहे. सोलापूर येथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील असे समजते.