बार्शी/प्रतिनिधी:
बार्शी: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बार्शी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात ८१ जणांनी रक्तदान केले.

तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या तरुण गटाने खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त स्वतंत्रपणे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचे उद्घाटन प्रसिद्ध स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. कुमार जगताप यांच्याहस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य जयकुमार शितोळे हे होते. तर, प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे राज्य उपाध्यक्ष किशोर मासाळ ,राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैद्यकीय सेलचे आवेद पटेल आणि एड. राहुल झालटे उपस्थित होते.

८१ जणांनी पक्ष आणि कार्यकर्त्यांशी रक्ताचं नातं जोडलं. कार्यक्रम यशस्वितेसाठी शेंद्रीचे उपसरपंच महेश चव्हाण, लिगल सेलचे अध्यक्ष एड. हर्षवर्धन बोधले, युवक तालुका अध्यक्ष एड. अमोल कुदळे, विद्यार्थी तालुका अध्यक्ष रत्नदीप कुलकर्णी, पदवीधर जिल्हा कार्याध्यक्ष विक्रांत पाटील, शहराध्यक्ष अमोल आंधळकर, कार्याध्यक्ष ऋषिकांत पाटील, अल्पसंख्यांकचे इब्राहिम शेख, तालुका उपाध्यक्ष पंकज पिसाळ,
धडाडीने सहभागी होणारे शिरीष ताटे, युवकेच रवि साळुखे, उमेश नेवाळे, वलीमभाई शेख, पृथ्वीराज उमाप, प्रतिक हिरे, वैभव कदम, शुभम ठाकरे, किरण मसेकर, शरद कापसे या युवकांनी परिश्रम घेतले. दरम्यान, किशोर मासाळ यांनी युवकांच्या परिश्रमाचे आणि धडाडीचे कौतुक करत, प्रत्येक कार्यक्रमासाठी सोबत असल्याचे आश्वासन दिले.