कोरोना महामारीच्या काळात सर्वसामान्यांपासून ते नेतेमंडळी आणि सेलिब्रिटी अशा सर्वानाच कोरोना झाला होता. व होत आहे यातून अनेकजण बरे झाले आहेत. भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि विधानपरिषद सदस्य सुजितसिंह ठाकूर हे त्यांच्या कुटुंबातील सहा सदस्यांसह बार्शीत उपचारानंतर विघ्नहर श्री. गणेश आगमनाच्या पूर्वसंध्येला सर्व सदस्य कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

याबाबत ठाकूर यांनी सोशल मीडियावर एका पोस्ट द्वारे म्हटले आहे की, आमचे १४ जणांचे एकत्रित कुटुंब असून आई, वडील, मी, पत्नी, मुलगी, मुलगा, मोठ्या भावाची पत्नी, मुलगी, लहान भाऊ व त्याची पत्नी, मुलगी, मुलगा असे परिवारातील एकूण १२ जण कोरोना बाधित झालो होतो. ६ जण लक्षणे नसल्याने शेतात विलगीकरणात बरे झाले. तर आई डाॅ. सोमाणी हास्पीटल, बार्शी येथे कोरोनावर मात करून ४ दिवसापूर्वीच घरी परतली आहे.
वडील, मी, सौभाग्यवती, मुलगी आणि लहान भाऊ १४ आगस्टपासून डाॅ. योगेशजी सोमाणी यांच्या मार्गदर्शनाखाली नर्गीस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पीटल, बार्शी येथे उपचार घेत होतो. कुलस्वामिनी तुळजाभवानी, श्री. विठ्ठल, समर्थ कृपेने विघ्नहर्ता गणेश आगमनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी कुटुंबातील सर्वजण कोरोनामुक्त होऊन घरी परतलो आहोत.

सोमाणी हॉस्पीटल, बार्शी येथील डाॅ. योगेशजी सोमाणी व त्यांचा सर्व स्टाफ, तसेच नर्गीस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पीटल, बार्शी येथील कोविड सेंटरचे डाॅ. योगेश कुलकर्णी, प्रशासकीय अधिकारी किशोर परांजपे, सर्व डॉक्टर्स, सिस्टर्स, ब्रदर्स, सर्व कर्मचारी आणि विश्वस्त सर्वांचे मनःपूर्वक आभार.!
बार्शी येथील नर्गीस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पीटलचे सर्वजण खूप चांगल्या पद्धतीने, खूप आत्मियतेने या कोरोना प्रादुर्भावाच्या काळात रूग्णसेवेचे प्रामाणिक कार्य करीत आहेत. सर्वांचे पूनःश्च आभार.! परंडा येथील योगीराज हॉस्पीटलचे प्रमुख व उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. देवदत्त कुलकर्णी तसेच त्यांचा सर्व स्टाफ या सर्वांचेही मनःपूर्वक आभार.!
या काळात काळजीपोटी अनेकांचे सतत खूप फोन आले. परंतू सर्वांशी फोनवर बोलणे शक्य नव्हते. त्याबद्दल पूनःश्च एकदा दिलगिरी व्यक्त करतो. SMS द्वारा संपर्कात होतोच. या कठीण काळात आपणां सर्वांकडून मिळालेले निखळ प्रेम, आत्मियता, सद्भावना माझ्यासह कुटुंबियांच्या कायमच स्मरणात राहील. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील काही दिवस घरीच विलगीकरणात असणार आहे.
धन्यवाद????
आ. सुजितसिंह ठाकूर
प्रदेश सरचिटणीस, भाजपा.
मुख्य प्रतोद, विधानपरिषद.