राज्यात तालुका पातळीवर बार्शीत भाजपला सर्वाधिक ग्रामपंचायती; आमदारांचे फडणवीसांनी केले विशेष अभिनंदन
बार्शी; ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर तालुक्या प्रमाणेच राज्यात देखील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधीपक्ष भाजपात कुणाच्या ग्रामपंचायती जास्त निवडून आल्या यावर वाद-प्रतिवाद सुरू आहे. राज्यात एका तालुक्यातील ग्रामपंचायती जिंकल्याबद्दल आमदार राजेंद्र राऊत यांचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विशेष अभिनंदन केले आहे.


राज्यात सर्वाधिक ग्रामपंचायत सोलापूर जिल्ह्यात भाजपने जिंकल्याबद्दल भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा सत्कार मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालयात देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
त्याचवेळी राज्यातील इतर तालुक्यांपैकी भाजपाच्या सर्वाधिक जागा बार्शी तालुक्यात जिंकल्याबद्दल बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले.आहे. बार्शीत 78 पैकी तब्बल 51 ग्रामपंचायती या आमदार राजेंद्र राऊत गटाने (भाजप) जिंकल्या आहेत. येथे त्याची प्रमुख लढत ही माजी आमदार दिलीप सोपल यांच्या गटविरोधात झाली