वाढदिवस विशेष: बार्शीच्या राजकारणातील चाणक्य नागेश अक्कलकोटे

0
196

वाढदिवस विशेष: बार्शीच्या राजकारणातील चाणक्य नागेश अक्कलकोटे

पंकज शिंदे

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

बार्शी: अंगी असलेली अभ्यास करण्याची वृत्ती, कोणत्याही विषयाचे लगेच होणारे आकलन, धाडस, समयसुचकता, वकृत्वावर असलेला प्रभुत्व आदी गुणांच्या जोरावर कोणताही राजकीय वारसा नसताना स्वकर्तृत्वावर बार्शी शहर व तालुक्याच्या राजकारणात बार्शी नगरपालिकेचे विरोधीपक्षनेते नागेश अक्कलकोेटे यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

राजकारणात अनेक कार्यकर्ते नेत्यावर निष्ठा ठेवून काम करत असतात. अनेकांना संधी ही मिळते, मात्र मिळालेल्या संधीचे सोने फार थोड्या जणांनाच करता येते. अशाच संधीचे सोने करणारा निष्ठावान कार्यकर्ता म्हणजे नागेश अक्कलकोटे. नागेश अक्कलकोेटे यांचा मुळ पिंड तसा पत्रकारितेचा. आणि पत्रकार म्हणून काम करीत असताना राजकारण्यांचा संबध आला. त्यांच्यात उठबस आली आणि त्यातून राजकारणाची गोडी लागली. २००१ सालच्या नगरपालिका निवडणुकीत नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी त्यांचे तत्कालीन आमदार दिलीप सोपल यांच्या गटाकडून पुढे आले मात्र त्यांचे वय कमी असल्याने त्यांच्या मातोश्री सुशिला अक्कलकोटे यांना उमेदवारी मिळाली व त्या विजयी झाल्या.

यादरम्यान पत्रकारिता करत-करत त्यांनी पालिकेच्या कारभारात लक्ष घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर नागेश यांच्या अंगी असलेल्या अभ्यासू वृत्तीची आ. सोपल यांनी दखल घेतली व २००६ साली त्यांची स्विकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती केली.

केवळ नगरसेवकच नव्हे तर त्यांच्या खांद्यावर सत्ताधारी पक्षाच्या गटनेतेपदाची जबाबदारी सोपवली. ती त्यांनी सक्षपणे पार पाडली.२००६ ते २०१६ या दहा वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी संपुर्ण पालिकेचा कारभार अप्रत्यक्षपणे पाहिला. त्यांना सोपल गटाचे चाणक्य म्हणून ओळखले जाऊ लागले.

त्यांनी पालिकेत काम करताना बार्शी शहराचा पाणीपुरवठा बळकटीकरण करणे, राज्यात नावाजलेला पुतळा पार्क, शहरात नगरोत्थान योजनेतून सिमेट क्राँक्रीटचे रस्ते करणे, सुजल निर्माण योजनेतून शहरात पाणीपुरवठा पाईपलाईनचे जाळे तयार केले. त्यांच्याच काळात जुन्या रेल्वेलाईनमुळे शहराचे दोन भागात झालेले विभाजन एक केले म्हणजेच कुर्डूवाडी रोडला जोडणारे सर्व छोटेमोठे रस्ते खुले केले.

या दहा वर्षाच्या काळात नगरसेवक म्हणून काम करताना त्यांनी माजी मंत्री दिलीप सोपल, औद्यागिक वसाहतीचे चेअरमन सुधीर सोपल यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेत सोपल यांनी त्यांच्यावर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या प्रदेश सचिवपदाची जबाबदारी सोपववी त्याला देखील त्यांनी न्याय दिला. यासोबतच जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून ही काम केले.हिरेमठ हॉस्पिटलवर संचालक म्हणून ते काम पहात आहेत. आनंदयात्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून राज्यस्तरीय आनंदयात्री एकांकिका स्पर्धेच्या माध्यमातून कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले.

मागील पाच वर्षापुर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकीतून ते जनतेतून निवडून आले. या काळात ते विरोधीपक्षनेते म्हणून काम करीत असताना सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्याचे काम सक्षमपणे करीत आहेत. क़ोरोना काळात देखील त्यांनी लोकांना मदत करण्याचे काम केलेच. मागील महिन्यातच वडील हरिभाऊ अक्कलकोटे यांच्या स्तृतिप्रित्यर्थ सुमारे विस लाख रुपये किमतीची कार्डियाक अँम्बूलन्स त्यांनी सतरावा पुठ्ठा गणपती ट्रस्टला देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्याचा रुग्णांना फायदा होत आहे.

कामाचा प्रचंड आवाका,नेत्याप्रती असलेली निष्ठा,कोणताही विषय समजून घेण्याची क्षमता, नेत्याचा असलेला विश्वास, तरुण कार्यकर्त्याचा संच यामुळे नागेश अक्कलकोटे हे नाव शहर व तालुकाच नव्हे तर राज्याच्या राजकीय वर्तूळात देखील सुपरिचित आहे़. आज त्यांचा वाढदिवस आहे त्यानिमीत्ताने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..

शिवजयंती च्या निमित्ताने अक्कलकोटे यांनी राज्यात प्रथमच शिवचरित्र पारायण सोहळा आयोजित केला होता. यामध्ये वा सी बेंद्रे लिखित शिवचरित्राचे दोन्ही खंड त्यांनी शेकडो शिव प्रेमी युवकांना भेट दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अभ्यासू भाषण करून या नेत्यांसह हजारो कार्यकर्त्यांची वाहवा त्यानी कित्येकवेळा मिळवली आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here