बार्शीत मोबाईल चोरीच्या गुन्हयाचा छडा “भाभी’ गॅगचा पर्दाफाश; बार्शी शहर पोलिसांची कामगिरी

0
620

बार्शीत मोबाईल चोरीच्या गुन्हयाचा छडा “भाभी’ गॅगचा पर्दाफाश; बार्शी शहर पोलिसांची कामगिरी

बार्शी: बार्शी शहरात दिपावली सणानिमीत्त खरेदी करण्याकरीता दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठया प्रमाणात गर्दी होणार आणी त्यातच संधी साधु चोरटे आपले काम दाखविण्याची जाणीव असल्यानेच बार्शी पोलिसांची गस्त सुरू असताना ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी भजी मंडई परिसरातून ग्राहकांचे मोबाईल चोरणाऱ्या भाभी गॅंग ला पकडण्यात बार्शी पोलिसांना यश आले आहे.या गॅंग मधील तिघांना अटक करून त्यांच्याकडून पाच मोबाईल सह साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

पोलीस अधिक्षक तेजस्विनी सातपुते , अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांचे मार्गदर्शनाखाली बाजारातील वाहनांची गर्दी तसेच जनतेच्या मालमत्तेच्या संरक्षणाचे दृष्टीने दिपावली सणानिमीत्त गेल्या 8 ते 10 दिवसांपासुन सतर्क राहुन अदयापर्यंत सर्वत्र दिपावलीमधील लक्ष्मीपुजन चालु असतानाही पोलीस अंमलदार यशस्वी पेट्रोलींग करीत आहेत.

दरम्यान शनिवार दिनांक 14 रोजी दुपारी साडेतीन वा. भाजी मंडई बार्शी येथुन मोबाईल चोरीस गेल्याबाबत तक्रार पोलीस ठाणेस येताच लागलीच पेट्रोलींग करीता असलेले पोलीस अंमलदार यांनी आपली यंत्रणा सतर्क करुन वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली बाजारपेठेत गस्त करीत असताना एका
संशयीतास हाक मारताच तो पळु लागल्याने त्याचा गस्तीवर असलेले पोलीस अंमलदार पोहेकॉ. संताजी आलाट व पोकॉ. रवि लगदीवे यांनी पाठलाग करुन त्यास पकडले.

त्याचेकडे चौकशी करीत असताना त्याने त्याचे नांव अहमद नजीर सय्यद रा. आकुलगांव ता. माढा जि. सोलापूर असे असल्याचे सांगुन त्याचे साथीदार सलीम हसन शेख रा. सदर तसेच शाहीदा अब्दुल शेख असे चारचाकी कारने बार्शीत आल्याचे सांगत असल्याने शिताफीने इतर दोघांचा शोध घेवुन त्यांना कारसह ताब्यात घेवुन चौकशी करीत असताना ते असंगत व उडवा उडवीची उत्तरे देवु लागले त्यांचेजवळ प्रत्येकी 2 मोबाईल फोन मिळुन आले असुन सदर मोबाईल फोनबाबत त्यांचेकडे चौकशी करीत असताना ते समाधानकारक उत्तरे देत नसल्याने सदर मोबाईल त्याच दिवशी भाजी मंडई बार्शी येथुन चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले आहे.

यातील आरोपीतांकडे सदर गुन्हयातील गेला माल रेडमी नोट प्रो कंपनीच्या मोबाईलसह इतर 5 वेगवेगळया कंपनीचे किंमती मोबाईल फोन तसेच गुन्हयाचेकामी वापरलेले चारचाकी वाहन असे एकुण 6 लाख 46 हजार 500/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर आरोपीतांना गुन्हयात अटक करुन त्यांना बार्शी न्यायालयात हजर केले असता दि.17 रोजी पर्यंतची पोलीस कोठडी मंजुर केली आहे.

तपासांती हे आरोपी “भाभी’ गॅगच्या नावाने प्रसिध्द
असुन सांगली, सातारा, सोलापूर येथील वेगवेगळया शहरांतील आठवडा बाजार तसेच गर्दीच्या ठिकाणावरुन मोबाईल हँडसेट तसेच दागीण्यांची चोरी करीत असल्याचे कळले.त्या अनुषंगाने पोलीस तपास करीत आहेत.

पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाचे पोलीस उप निरीक्षक प्रेमकुमार
केदार , सपोफौ. अजित वरपे, पोहेकॉ इसाक सय्यद, पोहेकॉ.संताजी आलाट, चंद्रकांत घंटे, गणेश दळवी, अमोल माने, रवि लगदीवे, ज्ञानेश्वर घोंगडे, पोकॉ रोहीत बागल, अर्जून गोसावी,पो ना. अमृता गुंड, मुंढे यांच्या पथकाने केला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास गणेश दळवी हे करीत आहेत.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here