बार्शी तालुका पोलीसांचा सहहृदयीपणा ; कॉन्सटेबल रामेश्वर मोहिते यांचे निधनानंतर कुटूंबाला दोन लाखांची आर्थिक मदत

0
1422

बार्शी तालुका पोलीसांचा सहहृदयीपणा ; कॉन्सटेबल रामेश्वर मोहिते यांचे निधनानंतर कुटूंबाला दोन लाखांची आर्थिक मदत

बार्शी(प्रतिनिधी)- बार्शी तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस कॉन्सटेबल रामेश्वर मोहिते यांचे काही दिवसापूर्वी विजेच्या धक्याने दु:खद निधन झाले होते. ते चिखली ता.जि. उस्माबाद येथील रहिवाशी होते. ते बार्शी तालुका पोलिस ठाणे येथे कार्यरत होते.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

रामेश्वर मोहिते हे त्यांच्या प्रेमळ व मनमिळावू स्वभावाने प्रचलित होते. पाच महिन्यापूर्वी त्यांचा विवाह झाला होता. रामेश्वर मोहिते यांच्या जाण्याने त्यांचे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला यात त्यांचेच सोबत काम करणारे बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस आणि सहाय्यक पोलीस अधिकारी यांनी मिळुन मोहिते यांचे कुटूंबाला दोन लाख रुपयांचा धनादेश देऊन आर्थिक मदत केली आहे.

यावेळी ही मदत नव्हे तर आम्ही आमचं कर्तव्य पार पाडतोय असे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव जायपत्रे यांनी सांगितले. सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आणि बार्शी विभागाचे उपअधीक्षक अभिजित धाराशिवकर यांनी बार्शी तालुका पोलिसांचे कार्याबद्दल कौतुक केले.

solapur Barshi SolapurRuralPolice

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here