बार्शीत किरकोळ कारणावरून दोघांना मारहाण; तिघांविरुद्ध शहर पोलीसात गुन्हा दाखल

0
467

पाण्याच्या टाकीवर बसु न देण्याच्या कारणांवरुन दारू पिऊन येऊन घरात घुसून मुलीसह भांडणे सोडवण्यास आलेल्या अन्य एकास लाकडी दांडके व प्लास्टीक पाईपने मारहाण करून जखमी केल्याचा प्रकार बार्शीत घडला.

नारायण लोखंडे, तात्या लोखंडे व विक्रम पारडे सर्व रा. लहूजी चौक, बार्शी अशी याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

नदिनी संतोष साळुंके वय 17 वर्षे, व गणेश माणिक सकट रा. लहुजी चौक, बार्शी अशी प्लस्टिक पाईप व लाकडी दांडक्याने झालेल्या मारहाणीत जखमी झालेल्याची नावे आहेत.

श्रीमती सारीका संतोष साळुंके वय-30वर्ष,रा.  झाडबुके मैदान बार्शी यांनी शहर पोलीसात फिर्याद दिली आहे.फिर्यादीत म्हटले आहे की त्या मुलगी नंदिनी व बहिणीची मुलगी मोहिणी असे एकत्रीत राहण्यास आहेत.

यापुर्वी त्या राहत असलेल्या परिसरातील नारायण लोखंडे, विक्रम पारडे व इतर व्यसनी तरुण मुलं घरालगत असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून, दारू पिऊन गांजा ओढत बसल्याचे कारणांवरुन या मुलांबरोबर त्यांचा वाद झाला होता.

  त्यामुळे पाण्याच्या टाकीला तारेचे कुंपण लावुन त्या लोकांना पाण्याच्या टाकीवर चढण्याचे बंद केले होते. याकारणांमुळे ते लोकं फिर्यादीवर चिडून होते.

  
सायंकाळी 07/30 वा. चे सु. फिर्यादी घराबाहेर बसलेली असताना मुलगी नंदिनी व बहीणीची मुलगी मोहिनी ह्या दोघी घरात मोबाईल बघत बसलेल्या होत्या. त्यावेळी  घरासमोर पाण्याच्या टाकीवर नारायण लोखंडे, तात्या लोखंडे व विक्रम पारडे  हे दारु पिऊन धिंगाणा घालत होते. त्यावेळी अचानक ते तिघे  घराकडे आले व नारायण लोखंडे याने  घराच्या पत्रावरील पडलेला पाण्याचा प्लास्टिक पाईप व तात्या लोखंडे याने लाकडी दांडके घेवुन ते तिघेही  घरात घुसले.

मोठमोठ्याने  शिवीगाळी करुन तुम्हीच आमच्या आडवा येता, तुमचा काटाच काढतो असे म्हणुन मुलगी नंदिनी हिला प्लस्टिक पाईप डोक्यात मारला. तिला मारल्यामुळे व त्यांचे आरडा-ओरड्यामुळे मुलगी नंदिनी हिला चक्कर येवुन पडली. सदरचे लोक मारहाण करीत असल्यामुळे मी मोठ्याने ओरडल्यामुळे रस्त्याने जाणारे गणेश  सकट  हे भांडन सोडवण्यासाठी घरात आले असता त्यांना देखील पाईपने व लाकडी दांडक्याने त्या लोकांनी मारहाण केली. त्यामध्ये गणेश सकट याचे डोके फूटून रक्त येवु लागले. त्यावेळी त्या लोकांनी घरातील साहित्य फेकून फोडाफोडी केली आहे.

  
बार्शी शहर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध धमकी देऊन मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here