बार्शी : शेतमालातील निम्म्या वाट्याची मागणी करुन आईवडिलांना शिवीगाळ व मारहाण केल्याचा प्रकार बार्शी तालुक्यातील शिराळे येथे घडला.
रत्नमाला चंद्रकांत चौधरी, (वय ५५),रा. शिराळे,ता. बार्शी, यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मी व माझे पती चंद्रकांत एकत्र रहात असून, आमची दोन मुले सुर्यकांत व सुशांत ही त्यांच्या कुटुंबासोबत वेगवेगळे रहात असून ते आमच्या शेजारीच राहतात.
दि. १५ एप्रिल २०२२ रोजी सकाळी सहाचे सुमारास माझा मोठा मुलगा सुर्यकांत चंद्रकांत चौधरी हा दारु पिऊन आला. त्यावेळी आम्ही शेतातून करुन आणलेला हरभरा माझे पती घरात टाकत असताना, त्याने मला व माझे पतीला शिवीगाळी करुन, माझ्या अंगावर धावून येत यातला निम्मा माल मला दिल्याशिवाय मी तुम्हाला तो विकायला नेऊ देणार नाही असे म्हणू लागला.

तेव्हा याचा झालेला निम्मा खर्च तू दे आणि निम्मा माल घे असे मी म्हणाताच, त्याने तेथेच पडलेल्या दगडाने माझ्या कंबरेवर व डाव्या गुडघ्यावर मारुन मला म्हणाला की, पुढच्या वेळी तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देवून निघून गेला.
रत्नमाला चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पांगरी पोलीस ठाण्यात भा.दं.वि. १८६० कलम ३२४,५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.