बार्शी : तालुक्यातील घोळवेवाडी येथे दि. १२ एप्रिल २०२२ रोजी सकाळी दहाच्या सुमारास डोळे पती पत्नी शेतात काम करत असताना, त्यांच्या भाऊकीमधील काशिनाथ कुंडलिक डोळे, श्रीराम काशिनाथ डोळे, संगिता काशिनाथ डोळे आणि पल्लवी श्रीराम डोळे हे तेथे आले. आणि तुमची मुलगी दिपालीने झोक्याची साडी का फाडली असे विचारत, आम्हाला शिवीगाळी करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, काठी व दगडाने मला व माझ्या पतीला मारुन जखमी केले. सदर प्रकाराबाबत त्यांनी माफी मागितल्यामुळे आम्ही तक्रार दिली नव्हती.
पुन्हा दि. १३ एप्रिल २०२२ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास मी व माझे पती आमच्या घरासामोर थांबलो असताना, काशिनाथ कुंडलिक डोळे, श्रीराम काशिनाथ डोळे, संगिता काशिनाथ डोळे आणि पल्लवी श्रीराम डोळे हे तेथे आले आणि तुम्ही आमचे काही करु शकत नाही असे म्हणून शिवीगाळ करत दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आणि पुन्हा आमच्या नादी लागलात तर तुम्हा दोघांना आणि तुमचा मुलगा तुकाराम याला जीवे ठार मारु अशी धमकी दिली.

अशी फिर्याद सिमीता नरसिंह डोळे, (वय ३४) रा. घोळवेवाडी, ता. बार्शी यांनी पांगरी पोलीस ठाण्यात दिली. त्यावरुन वरील चौघाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.