बार्शीच्या जलमित्र संदीप पवार यांनी बनवली पर्यावरण पूरक इको फ्रेंडली राखी..

0
450

बार्शी: गेल्या दोन वर्षांपासून पाणी फाऊंडेशनच्या चळवळीशी जोडले गेलेले जलमित्र बार्शीचे संदीप पवार यांनी बनवली पर्यावरण पूरक राखी.

येत्या तीन तारखेला रक्षाबंधन असून बार्शीतील लॉकडाऊन एक तारखेला संपेल. पण राखी खरेदीसाठी बाजारात गर्दी झाली तर कोरोना संक्रमणाचा धोका वाढेल. आणि म्हणून काल यावर विचार करत YouTube वरून काही व्हिडिओ पाहून त्यांनी त्यांच्या घरी काही इको फ्रेंडली राख्या बनवल्या आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

ज्यामध्ये किचन मद्ये असणाऱ्या डाळी, तांदूळ, जिरी, मोहरी, गहू, त्याचप्रमाणे दोडका, कारले, भोपळा, शेवरी, भेंडी, करंजी, मेथी, शेवगा यांसारख्या सहज उपलब्ध होणाऱ्या अनेक बिया वापरल्या आहेत.

राखी बांधायला लेस म्हणून जुन्या साडीचा कपडा वापरला आहे. यात कुठंही प्लास्टिक, कलर किंवा निसर्गाला हानी पोचवणारी एकही गोष्ट वापरली नाही. ही राखी आपण जर माती मध्ये पुरून टाकली तर नक्कीच त्यामधील बियामधून रोपटे तयार होईल व त्याचा पर्यावरणाला ???? व आपणाला नक्की फायदा होईल.

चला तर मग घराबाहेर राखी खरेदी साठी न पडता आपणही अशा इको फ्रेंडली राख्या तयार करा व कोरोना संक्रमणा पासून स्वतःला व कुटुंबाला दूर ठेवा. त्याचप्रमाणे पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावा. असा संदेश ही त्यांनी सर्वांना दिला आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here