बार्शीचे श्रीशिवाजी महाविद्यालयच बॉस
अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या १८ व्या युवा महोत्सवाचे जल्लोषात बक्षीस वितरण
सुरज काळे गोल्डन बॉय
तृप्ती बेंगलोरकर गोल्डन गर्ल

बार्शी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या १८ व्या युवा महोत्सवामध्ये बार्शीच्या श्री #शिवाजीमहाविद्यालयानेप्रथम क्रमांक पटकवत आम्हीच युवा महोत्सवाचे ‘बॉस’ आहोत हे पुन्हा एकदा सिध्द केले. द्वितीय क्रमांक संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर व तृतीय क्रमांक शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालय, अकलुज यांनी पटकवला.

दि. ९ ते १२ ऑक्टोबर दरम्यान पार पडलेल्या युवा महोत्सवाच्या स्पर्धेचा अतिशय उत्साही व जल्लोशपूर्ण वातावरणात समारोप करण्यात आला. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी २९ कला प्रकारामध्ये सहभाग नोंदवला होता. यावेळी एकूण महत्वाच्या पाच कला प्रकारांचे विभागीय विजेतेपद घोषित करण्यात आले. यामध्ये ललित वाङमय व नाटय विभागामध्ये श्री शिवाजी महाविद्यालयात बार्शी,नृत्य विभागामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ तर संगीत विभागामध्ये डी बी एफ दयानंद महाविद्यालयात सोलापूर या महाविद्यालयांनी क्रमांक पटकाविले.
जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातून सर्वांची उत्सुकता लागलेल्या गोल्डन बॉय म्हणून श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सरज काळे याची तर गोल्डन गर्ल म्हणून सांगोला महाविद्यालयाची तृप्ती बेंगलोरकर यांची निवड करण्यात आली. या बक्षीस वितरण समारंभाला सैराट चित्रपटाची अभिनेत्री रिंकू राजगुरू, खासदार धनंजय महाडिक, प्रकुलगुरू राजेश गादेवार, कुलसचिव योगिनी घारे, वित्त व लेखाधिकारी श्रेणीक शाह आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशपाल खेडकर यांनी केले