बार्शीत सहाय्यक निबंधक पथकाची अवैध सावकाराच्या घरी धाड ; संशयास्पद कागदपत्रे केली जप्त

0
160

बार्शी: बार्शी शहरातील उपळाई रोड, नाईकवाडी प्लॉट
येथील रंजेश मुसळे व राकेश मुसळे यांचे राहते घरी व भगवंत मंदिर येथील दुकानी सहाय्यक निबंधक, बार्शी व बार्शी शहर पोलिस यांचे संयुक्त विद्यमाने अनिल मुरलीधर खाडे रा.दत्तनगर, बाशी यांचेकडील तक्रार अर्जाच्या अनुषंगाने अवैध सावकारी अंतर्गत थाड टाकण्यात आली.यामध्ये अवैध सावकारी संदर्भातील कोरे चेक, स्टॅम्प, साठेखत, आदी अवैध सावकारी बाबतची संशयीत कागदपत्रे जप्त करण्यात आली.

सहाय्यक निबंधक कार्यालयातील सचिन महाडिक यांच्या पथकानी सदर थाडीची कार्यवाही सोमवारी रात्री ९ ते १२ च्या सुमारास केली. या पथकामध्ये सतिश मोरे, उमेश
मुसळे, सुहास राऊत हे सहकार खात्यातील व बाशी शहर पोलिस स्टेशन मधील कर्मचारी सहभागी झाले होते.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

घरझडतीमध्ये सचिन महाडीक यांच्या पथकाकडून ७ सही केलेले कोरे चेक, एक ४ लाख रुपयाचा चेक, एक २४ हजार रुपयांचा चेक, पाच कोरे स्टैप २ कोऱ्या स्टॅपची
झेरॉक्स, रु. १००/- च्या स्टैंप वरील उसनवार पावतीची झेरॉक्स. एक कब्जे साठेखत, एक साठेखत, फेरखरेदी बाबतचे पत्र इत्यादी अवैध सावकारी बाबतची संशयीत कागदपत्रे जप्त करण्यात आली.

पुढील चौकशी सहाय्यक निबंधक अमोल निरडे, यांचेमार्फक सुरु आहे. चौकशी पुर्ण झालेनंतर दोषीवर महाराष्ट्र सावकरी (नियमन) अधिनियम २०१४ मधील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात येईल असे सहाय्यक निबंधक अमोल निरडे यांनी सांगीतले.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here