बार्शीपुत्र विशाल फटे यांचा अल्गो ट्रेडिंग च्या कामाबद्दल झी मीडियाच्या पुरस्काराने सन्मानित
Zee हिंदुस्थान RISE Startup To Unicorn (New Delhi) हयात रीजेंसी दिल्ली येथे केंद्रीय वाणिज्य तथा उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते बार्शीचे सुपुत्र विशाल फटे यांना झी मीडिया च्या पुरस्काराने सन्मानित करण्यातआले.


विशाल फटे हे शेअर मार्केट क्षेत्रातील तज्ञ आहेत व शेअर गुंतवणूक मार्गदर्शक म्हणून काम करत आहेत.बार्शीत ते विशालका कन्सल्टंट सर्व्हिसेस प्रा. ली. ही कंपनी चालवतात. शेअर मार्केट मध्ये ऑटो (कोडिंग) ट्रेडिंग सिस्टीम त्यांनी विकसित केली आहे. त्यांची यापूर्वी अनेक बिझनेस चॅनल वर मुलाखती झाल्या आहेत.
मंत्री पीयूष गोयल – यांच्या हस्ते अल्गो ट्रेडिंग सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान विकासासाठी पुरस्कार मिळाला. शेवटी सर्व कठोर परिश्रम आणि समर्पणाचे फळ मिळाले. मला आर्थिक श्रेणीत फक्त एकाची निवड केल्याबद्दल झी मीडियाचे आभार अशी प्रतिक्रिया विशाल फटे यांनी व्यक्त केली
