सोलापूर स्मार्ट सिटीच्या सीईओ पदी बार्शीपुत्र त्रिंबक ढेंगळे-पाटील यांची नियुक्ती

0
478

सोलापूर : सोलापूर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनी (स्मार्ट सिटी)च्या कार्यकारी संचालक बार्शी तालुक्यातील जवळगावचे सुपुत्र व कार्यक्षम अधिकारी असलेल्या त्रिंबक ढेंगळे-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती प्रतिनियुक्तीने असून ढेंगळे-पाटील यांनी शुक्रवारी सायंकाळी पदभार घेतला.

केंद्र शासनाच्या संकल्पनेतून स्मार्ट सिटी योजना राबविली जाते. स्मार्ट सिटी अंतर्गत निवड झालेल्या शहरांमध्ये कामे करण्यासाठी एका कंपनीची स्थापना केली जाते. या कंपनीचे अध्यक्ष राज्याच्या सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांकडे असते. या कंपनीत संचालक म्हणून महापौर, उपमहापौरसह पदाधिकारी, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त आणि इतर तज व्यक्तीचा समावेश आहे. कंपनीची स्थापना झाल्यानंतर पहिले काही दिवस अमिता दगडे यांची तर काही महिन्यानंतर संजय तेली यांची कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

तेली यांच्या बदलीनंतर तत्कालीन मनपा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी सीईओंचा पदभार सांभाळला. महापालिकेचे सध्याचे आयुक्त पी. शिवशंकर यांची सीईओपदी नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, आता त्रिंबक ढेंगळे-पाटील यांची कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ढेंगळे-पाटील यांनी यापूर्वी महापालिकेचे उपायुक्त म्हणून काम पाहिले आहे.

त्यानंतर त्यांची उस्मानाबादला जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. तत्पूर्वी त्यांनी सोलापूर ला जिल्हा प्रशासन अधिकारी आणि बार्शी नगरपालिकेमध्ये मुख्याधिकारी म्हणून उत्कृष्ट काम केले आहे.तसेच इचलकरंजी, आणि उस्मानाबाद ला ही त्यानी कारकीर्द गाजवली आहे.आता ते स्मार्ट सिटीचे कार्यकारी संचालक म्हणून रुजू होत आहेत. त्यांचा कालावधी एक वर्षाचा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here