बार्शीकरांनो आता तरी सावध व्हा : बार्शी तालुक्यात कोरोनाचा विळखा वाढला ; शुक्रवारी सापडले १०९ रुग्ण

0
94

बार्शीकरांनो आता तरी सावध व्हा : बार्शी तालुक्यात कोरोनाचा विळखा वाढला ; शुक्रवारी सापडले १०९ रुग्ण एकुण आकडा झाला ३४५ ; शहरात कंटनमेट झोन संख्या -६०

गणेश भोळे

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा


बार्शी – बार्शी तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत भयानक व झपाट्याने वाढ होत असून शुक्रवार दि .१७ जुलै रोजी आलेल्या अहवालात बार्शी शहर व तालुक्यात १०९ कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडुन आता पॉझिटिव्ह  रुग्णांची एकुण  संख्या ३४५ वर पोहचल्याने संपूर्ण तालुक्यात सन्नाटा पसरला आहे तर    सर्वत्र नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

बार्शी शहर , वैराग तसेच संपुर्ण तालुक्यात कोरोना  रुग्णांची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सदयस्थितीत प्रशासनाकडुन बार्शी तालुक्यात होत असलेल्या रुग्ण वाढीस आळा घालण्याचे प्रयत्न फोल ठरत आहेत. दिवसेंदिवस या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जलद गतीने बार्शी,वैराग सह ग्रामिण भागात ही पसरला आहे . आज आलेल्या अहवालातही बार्शी शहर वैराग व परिसातील रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडले आहेत.


आज आलेल्या अहवालात एकूण तालुक्यात १०९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आले यात ७३ पुरुष व ३६ महिलांचा समावेश आहे .२९५ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरु आहेत . तर ४२ रुग्ण आत्तापर्यत बरे झाले आहेत . आत्तापर्यंत ८ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. तर एकट्या बार्शी शहरातच ६० प्रतिबंधीत क्षेत्रे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here