बार्शी ! मांडूळ जातीच्या सापाची तस्करी तीन जण ताब्यात ; बार्शी तालुका पोलिसांची कामगिरी
बार्शी/प्रतिनिधी:
मांडूळ जातीच्या सापाची बेकायदेशिर तस्करी तीनजण ताब्यात बार्शी तालुक्यातील पानगाव येथे मांडूळ जातीच्या सापाची बेकायदेशिर तस्करी करणाऱ्या तीघांविरुध्द तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सुरेश उल्हास राठोड (वय 25)चेतन उल्हास चव्हाण (वय 26 दोघे रा.पारध जि यवतमाळ) पंकज बंन्शी उचाडे (वय 29 वर्षे रा.
संभाजीनगर पुसद जि.यवतमाळ )असे अटक केलेल्या तिघां आरोपीचे नावे आहे. अधिक माहीती की पो.हे.कॉ रियाज शेख,पो.कॉ बळीराम बेदरे, होमगार्ड रेवन गात व चालक ज्ञानेश्वर काटकर हे पानगाव बीट हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना ज्योतिबा मंदिर पानगाव येथे तीन इसम हे मांडूळ जातीचा साप एका प्लॅस्टिक बकेट मध्ये घेवून जात असताना त्यांना स्वप्नील मोरे व दत्तात्रय जाधव दोघांनी थांबविले असल्याची माहीती मिळताच तालुका पोलीसचे प्रभारी अधिकारी स.पो.नि शिवाजी जायपत्रे यांचे मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी गेले असता तीन इसम त्यांचेजवळ एका प्लॅस्टिक बकेट घेवून झाडाखाली बसले होते.
इसमांना बकेट मध्ये काय आहे असे विचारले असता त्यांनी मांडूळ जातीचा साप असल्याचे सांगितले. त्यात एक काळया रंगाचा अंदाजे साडे तीन ते चार फुट लांबीचा व चार इंच जाडीचा मांडूळ जातीचा साप असल्याची खात्री झाल्याने पुढील कायदेशिर कार्यवाही करीता वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे ताब्यात दिले आहे.