बार्शी: बार्शी तालुका पोलीस ठाणे यांचे कडे दाखल असलेले विविध नऊ गुन्हे उघकडीस आणुन २४ लाख रु किंमतीचा मुद्देमाल माल जप्त केला आहे.

बार्शी तालुका पोलीस ठाणे हद्दीत वाढत्या चोरी व शेत मालाच्या चोरीच्या घटनामुळे पोलीस अधीक्षक सोलापुर
ग्रामीण यांनी सदर गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने प्रभारी अधिकारी सपोनि शिवाजी जायपत्रे यांनी फौजदार जाधव,पो.
ना/अभय उंदरे,अमोल माने, पो.कॉ/धनराज फत्तेपुरे यांचे विशेष पथक नेमले होते.
पो.ना/उंदरे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीद्वारे व पो.कॉ/धनराज फत्तेपुरे, रतन जाधव सायबर सेल यांनी तांत्रिक विश्लेषणामुळे आरोपी निष्पण्ण करुन आरोपी माणिक गुलाब काळे वय-३० वर्षे धंदा- मजुरी रा. कासारखाणी ता.वाशी जिल्हा – उस्मानाबाद यांचेवर वॉच ठेवनु , सदर आरोपी हा वाशी गावाचे बाजारपेठेत ता.वाशी जिल्हा उस्मानाबाद येथे खरेदी करण्यासाठी येणार आहे अशी गोपनीय माहिती मिळाली होती. आरोपी माणिक काळे यास दिनांक २९ रोजी ताब्यात घेवुन बार्शी पोलीस ठाणे येथे आणुन त्यास विश्वासात घेवुन तपास केला असता त्यांचे इतर तीन साथीदाराच्या मदतीने बार्शी तालुका पोलीस ठाणेकडील नऊ गुन्हे कबुल केलेले आहेत.

या गुन्हयामध्ये गेलेला माल मोबाईल टॉवरचे बॅट-या, इलेक्ट्रीक पोल वरील तारा, मुग, उदीड, पेरणी यंत्र, ढोकी पोलीस ठाणे कडील १० टायरचा टिपर असा एकुण २४,०८४२४/- रु किंमतीचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वनी सातपुते , अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरिक्षक सर्जेराव पाटील, बार्शी उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित धाराशिवकर यांचे मार्गर्शनाखाली
सपोनि शिवाजी जायपत्रे,पोसई/प्रवीण जाधव,शेख,सुभाष सुरवसे,गोरख भोसले,राजेंद्रमंगरुळे,गायकवाड,दशरथ बोबडे,अमोल माने,अभय उंदरे, तानाजी धिमधिमे,केसरे,धनराज फत्तेपुरे,बळीराम बेदरे, सुरेश बिरकले, खोकले, मेहेर,वैभव भांगे, समीर पठाण ,केकाण यांनी गुन्हयाची कामगिरी बजावली.