बार्शी तालुक्यात कोरोना बाधित संख्येत ५ ने वाढ एकुण संख्या पोहचली – ५९२
बार्शी तालुक्याच्या बुधवार दि. २२ रोजी आलेल्या अहवालात ५ रुग्ण पॉझिटिव्ह निघाले आहेत यामुळे आता कोरोना रुग्ण संख्या ५९२ वर गेली आहे.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा


बार्शी तालुक्यात गेली काही दिवसात सातत्याने कोरोना रुग्णांची झापाट्याने वाढ होत आहे. रोज येणारी आकडेवारी बार्शीकरांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. आज जिल्हा आरोग्य विभागाच्या अहवाला नुसार बार्शी शहरातील सुभाष नगर -१ व तेल गिरणी चौकातील १ असे दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे तर ग्रामिण भागातील जामगाव – २ व सर्जापुर १ असे तीन रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत .
बार्शी शहरात २८९ रुग्ण संख्या आहे तर ग्रामिण मध्ये ३०० रुग्ण संख्या असून यापैकी ४६० जणांवर उपचार सुरु आहेत.११२ रुग्णांना उपचार करून घरी पाठवले आहे .