बार्शी: पाथरी गावाजवळ दरोडा नवीन ट्रॅक्टर-ट्रॉलीसह १५ लाखांचा ऐवज लंपास
बार्शी/प्रतिनिधी:
बार्शी-येरमाळा रस्त्यावर पाथरीच्या पुढे दोन किलोमीटर अंतरावर पाच चोरट्यांनी ट्रॅक्टर चालकास थांबवून, त्याला मारहाण करून उसाच्या शेतामध्ये नेऊन बांधून ठेवले. नवीन घेतलेला ट्रॅक्टर, दोन ट्रॉली व रोख पाच हजार रुपये घेऊन चोरटे पसार झाले असून, बार्शी तालुका पोलिस ठाण्यात १५ लाखांचा ऐवज लंपास केल्या प्रकरणी पाच जणांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे.


जमखंडी येथील पडसलगी साखर कारखाना येथील ऊस वाहतूक यांच्यामध्ये करार करण्यात आला असून, त्यासाठी राठोड यांनी नवीन ट्रॅक्टर बीड येथून तर नवीन दोन ट्रॉली शेवरे टेंभुर्णी (ता. माढा) येथून खरेदी केल्या होत्या. टेंभुर्णी- कुर्डुवाडी- बार्शी मार्गे वडवणी येथे जात असताना पाथरीच्या पुढे दोन किलोमीटर अंतरावर रस्ता ट्रॉलीवरून चढून चार -पाच जण आले.
एकाने राठोड यांच्याजवळ येऊन ट्रॅक्टर बंद करण्यास भाग पाडले. चौघांनी खाली ओढून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आणि जवळच असलेल्या उसाचा शेतामध्ये उचलून घेऊन गेले. त्या वेळी एकजण ट्रॅक्टर ट्रॉलीसह घेऊन निघून गेला.
या वेळी खिशातील रोख पाच हजार आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपत्रे करीत आहेत.