बार्शी रेशन धान्य घोटाळा: बाजारसमिती बेमुदत बंद ठेवुन तपास कामावर दबाव आणणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा शेतकरी… राजेंद्र मिरगणेंचा इशारा
बार्शी: गत आठवडयामध्ये वाशी तालुक्यातील गरीबासाठी राज्य शासनाने मोफत वितरणासाठी दिलेला १९० टन तांदुळ पनवेल येथे तसेच वाशी उच्यतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुमारे ५०० क्विंटल गहू व तांबुळ तसेच उपळाई (ठो) व वैराग येथे सुमारे ३०० किंवटल गहू व तांदुळ काळया बाजारात विक्रीसाठी नेण्याच्या उद्देशाने ठेवलेला असताना त्या व्यापाऱ्यांसहित
पोलिस व पुरवठा खात्याच्या कारवाईत जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणाची व्याप्ती मोठी असुन तपासकाम व इतर काही आरोपींनापकडण्याचे व या प्रकरणाची समुळ धोकशीची प्रक्रिया सुरु आहे.या प्रकरणी बाजार समिती बंद ठेवून तपास यंत्रणेवर दबाव टाकून अडथळा निर्माण करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा शेतकरी आंदोलन करतील असा इशारा महाहाऊसिंग चे सह अध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.
या प्रकरणाचे सुत्रधार लब्ध प्रतिष्ठित व्यापारी व समितीचे काही पदाधिकारी असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या संपूर्ण चौकशी प्रक्रियेला खिळ घालण्यासाठी व त्या अनुषंगाने सुरु असलेले विविध भागातील पोलिसांचे धाडसत्र थांबविण्यासाठी शहरातील या काळा बाजाराशी संबंधित व्यापारी बाजार समिती बंद ठेऊन जनजीवन
विस्कळीत करण्याच्या प्रयत्नात आहेत.


सध्या चार महिन्याच्या लॉक डाऊन नंतर किंचीत सुरु झालेल्या बाजार समितीला बंद पाडून सर्वसमाजजीवन अस्थिर करुन हजारो नागरिकांच्या विशेषतः शेतकरी, कामगार, हमाल, लघुउद्योजक व अन्न प्रक्रिया उद्योगाशी संबंधित कारखानदार यांना वेठिला धरण्याचा हा प्रयत्न आहे.
त्यामुळे तालुक्यातील हजारो शेतकरी या लादलेल्या बंदच्या विरोधात आंदोलन करतील. तसेच शहरातील सचोटीने व प्रामाणिकपणे काम करणारा व्यापायांचा मोठा वर्ग या बंदच्या विरोधात आहे.

त्यामुळे अतिशय गंभीर संवेदनशील आर्थिक समस्या निर्माण होऊन बाशी तालुक्याच्या शांतता, कायदा व सुव्यवस्था यांना मोठा सुरुंग लागु शकतो. तरी या सर्व प्रश्नांचे गाभीर्य लक्षात घेऊन बाजार समिती बंद ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या व तपास कामात अडथळा आणणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी. हा बंद मागे घेतला गेला नाहीतर हजारो शेतकरी उग्र आंदोलन करतील याची नोंद घ्यावी.या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्र्यांसह संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.