बार्शी : नांदेड येथील बांधकाम व्यावसायिक व समाजसेवक संजय बिहाणी यांची दि. ७ एप्रिल २०२२ रोजी अज्ञात मारेकऱ्यांकडून भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
या भ्याड हल्ल्याचा बार्शी तालुक्यातील माहेश्वरी व राजस्थानी समाजाने जाहिर निषेध व्यक्त केला आहे.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सदर मारेकऱ्यांचा तात्काळ शोध घेऊन आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी समाजाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, विरोधी पक्षनेते, जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक यांचेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनाची प्रत बार्शीचे तहसिलदार सुनिल शेरखाने यांना देण्यात आली. यावेळी माहेश्वरी सभेचे पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.