बार्शी तालुक्यात २ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, एकूण रुग्णसंख्या झाली ५३ ,सोमवारी घेतले तब्बल ५८ स्वॅब
बार्शी :कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव बार्शी तालुक्यात दिवसागणिक वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे. आज सकाळी आलेल्या अहवालानुसार बार्शी शहरात उपचार घेत असलेल्या आसु ता .परांडा येथील १ रुग्ण पॉझिटिव्ह तर वैराग येथील शारदादेवी मोहोळ रोड येथील एक जण पॉझिटिव आला आहे .
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

यामुळे आता कोरोनाच्या संपर्कात आलेल्या रुग्णसंख्या ५३ झाली असुन यापैकी आत्तापर्यत तीघांचा मृत्यु झाला आहे .

आज दिवस भरात बार्शी शहर -२९ , वैराग-१२ , साकत (पिं) -६ ,काटेगाव -१ आगळगाव -३ पांगरी-१ कव्हे- ४कोरफळे -१सालसे (ता .करमाळा )-१ ,तर उपळाई (ठों) येथील २ व घारी -१ प्रलंबित असे एकूण ६१ स्वॅबचे अहवाल प्रलंबित असल्याची माहीत तालुका वैदयकिय अधिकार डॉ संतोष जोगदंड यांनी दिली .
