बार्शी! शिराळे मध्ये शेतीच्या कामावरून पतीची पत्नीला मारहाण ; पतीविरुद्ध पांगरी पोलिसात गुन्हा

0
181

बार्शी! शिराळे मध्ये शेतीच्या कामावरून पतीची पत्नीला मारहाण ; पतीविरुद्ध पांगरी पोलिसात गुन्हा

बार्शी/प्रतिनिधी:

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

बार्शी तालुक्यातील शिराळा येथे शेतात काम कोण करणार असा पत्नीने प्रश्न विचारतात पत्नीला दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना 22 ऑक्टोबर रोजी दुपारी अकराच्या दरम्यान शिराळा गावामध्ये घडली. आमृता आबासाहेब चौधरी (वय 38) रा.शिराऴा, ता.बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पती बाबासाहेब बाबासाहेब चौधरी भारतीय दंड संहिता ३२३, ३२४, ५०४ ५०६ कलमानुसार पांगरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी व त्यांचा मुलगा अमर असे शेतात पेरणी करत असताना माझे पती आबासाहेब बाबासाहेब चौधरी हे तेथे आले नंतर फिर्यादीनी त्यांना तुम्ही येरमाळा येथे कशाला गेला होतात, शेतात काम कोण करणार असे म्हणाले असता त्यांनी मला शिवीगाळी करून, अंगावर धावुन येवुन त्यांचे हातातील दगडाने माझे डावे हाताचे कोपरावर दगडाने मारून मला लाथा बुक्यांनी मारहाण करून माझा मुलगा अमर हा मला सोडवणे करीता आला असता त्याला ही त्यांचे हातातील दगडानी उजवे हाताचे मनगटावर मारले आहे. तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणुन धमकी दिलीआहे.

या घटनेचा अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत, अशी माहिती पांगरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल यांनी दिली.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here