बार्शी अन्नछत्र हल्ला प्रकरण: नगरसेवकासह सात जणांना 6 मार्च पर्यत पोलीस कोठडी

0
369

बार्शी : सोशल मीडियात टाकलेल्या पोस्टवरून शहरातील देवणे गल्ली येथे विद्यमान नगरसेवकासह 25 ते 30 जणांनी येऊन इंदुमती आंधळकर अन्नछत्रा ची तोडफोड करत सहाजणांना मारहाण केली. या प्रकरणी बार्शी शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

नगरसेवकासह सात जणांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात उभे केले असता न्यायदंडाधिकारी एन. एस. सबनीस यांनी त्यांना 6 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यात आरोपींतर्फे  ऍड. भारत कट्टे यांनी काम पाहिले. 

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

नगरसेवक अमोल चव्हाण, नाथा मोहिते, भगवान साठे, अतुल शेंडगे, रोहित अवघडे, प्रमोद कांबळे, बाबा वाघमारे (सर्व रा. लहूजी वस्ताद चौक) अशी पोलिस कोठडी मिळालेल्यांची नावे आहेत. जखमी सगीर रहिम सय्यद यांनी फिर्याद दाखल केली. ही घटना मंगळवारी रात्री साडेआठच्या दरम्यान घडली. बापू तेलंग, बादशहा बागवान, साजिद शेख, सूरज भालशंकर, मयूर शिनगारे अशी जखमींची नावे आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here