बार्शी! वाढदिवसाचा स्टेटस ठेवला नाही म्हणून मारहाण तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
वाढदिवसाचा स्टेट्स मोबाईल वर का ठेवला नाही म्हणून जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली आहे. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या आईलाही जातिवाचक शिवीगाळ करून असभ्य वर्तन केले आहे,या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस स्टेशन मध्ये एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बार्शी तालुक्यातील एका गावामध्ये फिर्यादी व त्याची आई दोघे घरासमोर बसली असता, त्यांच्या गावातील कौशिक पाटील हा तरुण मोटरसायकलवर आला अन रोडवर थांबून फिर्यादीत जातीवाचक शिव्या देऊ लागला. शिवीगाळ करू नकोस म्हणतात तू माझ्या वाढदिवसाचा टेटस मोबाईल वर का ठेवला नाही असे म्हणत जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली, या मारहाणीमध्ये आई सोडविण्यास आली असता तिलाही जातीवाचक शिवीगाळ व गालात चापट मारली.
व जाताना जीवे मारण्याची धमकी दिली आहे या भांडणांमध्ये फिर्यादीच्या आईच्या गळ्यातील सोन्याचे गंठण व बोरमाळ कडून गहाळ झाले आहे, या घटनेची फिर्याद तालुका पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आले आहे.