बार्शी काँग्रेसने यापुढील सर्व निवडणुका कोणाशीही आघाडी न करता लढवाव्यात – नाना पटोले
मुंबई – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून प्रत्येक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ निहाय मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्ते नेते यांच्या आढावा बैठका घेण्याचा सपाटा सुरू केला आहे.

बुधवार दिनांक १७ रोजी सोलापूर जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी बार्शी विधानसभा मतदारसंघामध्ये कशाप्रकारे रणनीती आखावी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बार्शी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. जीवनदत्त आरगडे यांनी बार्शी मतदारसंघ हा राजकीय दृष्ट्या लोकसभा उस्मानाबाद मध्ये असून महसुली जिल्हा म्हणून सोलापूर जिल्ह्यात समाविष्ट आहेत असे सांगून बार्शी तालुक्यातील संघटना वाढीबाबत परिस्तिथी कथन केली.
यावेळी बोलताना ॲड. आरगडे म्हणाले की बार्शी मतदारसंघ हा तीन भागात विभागला गेला आहे त्यामध्ये पहिला बार्शी शहर ज्यामध्ये ‘अ’ वर्गाच्या नगरपरिषदेचा समावेश आहे. आणि एक लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या आहे. दुसरा वैराग भाग ज्यामध्ये लवकरच वैराग नगरपंचायत होत आहे.

तिसरी उत्तर बार्शी. एक नगर परिषद एक नगर पंचायत आणि 137 ग्रामपंचायती. मोठी बाजारपेठ मोठी रेलचेल आणि रस्त्याच्या बाबतीत जंक्शन असणारा मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जाणारा पश्चिम महाराष्ट्रातील इचलकरंजी नंतर स्वतःच्या ताकतीवर राजकीय लोकांच्या योगदाना शिवाय उभा राहिलेला तालुका म्हणजे बार्शी तालुका असे ते म्हणाले.
बार्शी तालुक्यामध्ये काँग्रेसच्या विचारांचा 60 टक्केपेक्षा जास्त मतदार वर्ग असून तो मतदार राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवार यांच्या सोबत असणाऱ्या दिलीप सोपल यांच्या सोबत राहिला मात्र दिलीप सोपल हे काँग्रेसच्या विचारांपासून दूर होऊन ते कट्टरवादी पक्षाच्या मध्ये समावेश झाल्यामुळे लोकांनी त्यांना स्वीकारलेले नाही दुसरे विरोधक विद्यमान आमदार राऊत हे भाजपा समर्थक आमदार असल्याने काँग्रेसच्या विचारांच्या लोकांना नेतृत्वाचा शोध आहे.


वरिष्ठांनी ताकद दिली तर आम्ही बार्शीकर यांच्या नेतृत्वाच्या गरजा पूर्ण करू शकू असा आमचा विश्वास आहे आपण बार्शीचे पालकत्व घ्यावे अथवा कोणाकडे तरी बार्शीची जबाबदारी द्यावी आमदार प्रणिती ताई शिंदे यांची खूप मोठी क्रेझ संपूर्ण जिल्ह्यात आहेत ताईंनी लक्ष केंद्रित केल्यास बार्शी अतिशय सोपा मतदारसंघ आहे.
बार्शी जिल्हा निर्मिती हे आमचे स्वप्न असून त्याबाबत स्वतंत्र प्रस्ताव आम्ही लवकरच देत असून आपल्या महा विकास आघाडीच्या कालखंडात त्याबाबत आपण तात्काळ निर्णय घ्यावा बार्शीचे रखडलेले उपसा सिंचन प्रकल्प न्यायालयाची इमारत तसेच इतर अन्य पायाभूत सुविधा एम. आय. डी. सी. हे प्रश्न मार्गी लावून आपण स्वतः त्याबाबत पुढाकार घ्यावा आणि नगर परिषद निवडणुकीसाठी आम्हाला ताकद द्यावी जोपर्यंत लोकातून आपले काही उमेदवार निवडून येणार नाहीत तोपर्यंत राजकीय लोकमान्यता मिळण्यासाठी आम्हाला संघर्ष आहे.
आमच्याकडे जुगलकिशोर तिवाडी यांच्यासारखे अनुभवी मार्गदर्शक आहेत , वैराग भागात शिक्षण महर्षी बप्पा कोरके, मरोड आदी नेत्यांची ताकद आहे. उत्तर बार्शी मध्ये सुधीर बापू गाढवे आणि अन्य नेते सक्रिय आहेत.शहरातून आम्ही तरुण वर्गांचे संघटन करीत आहोत. त्यासाठी वरिष्ठांनी ताकद दिल्यास तो निश्चित विजय मिळवु असा आम्हाला विश्वास आहे. असे ते पुढे बोलताना ॲड. आरगडे म्हणाले.
नाना पटोले यांनी अध्यक्षीय भाषणात बार्शी कडे माझे विशेष लक्ष आहे . बार्शीतील लहानसहान घडामोडीला वरती माझे बारीक लक्ष आहे. माझी गुप्त यंत्रणा मला अहवाल देत असते. राज्यातील काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांना मी विशेष करून आपल्या जिल्ह्यात लक्ष द्यायला सांगेन तुम्ही ताकतीने तुमची कामे करा लोकोपयोगी कामात लक्ष घाला. लोकांना उपयोगी राहा लोक तुम्हाला न्याय देतील पक्ष तुमच्या पाठीशी आहेच. लोकांची कामे करा सरकार आपले नसले तरी सरकार आपल्यामुळे आहे याचे भान ठेवा.कधीही कोणती कसलीही अडचण आली तर कोणत्याही प्रशासनातील कोणत्याही अधिकाऱ्यांना विभागाला तशा स्पष्ट सूचना दिल्या जातील.
याबाबत आपण निश्चिंत रहा आगामी काळात काँग्रेस पक्ष कोणाशीही युती आघाडी करणार नाही त्यामुळे येणाऱ्या सर्व निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी तुम्हाला हवी ती मदत करण्यासाठी काय सोय करायची ती माझी जबाबदारी आहे. मंत्री तुमची कामे करतील.विधायक कामे करा लोक नोंदी ठेवत असतात. तुम्ही तुमचे कार्य सुरू ठेवा असे आश्वासन श्री नाना पटोले यांनी दिली.
यावेळी व्यासपीठावर प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे माजी आमदार बसवराज पाटील, युवक प्रदेश अध्यक्ष सत्यजीत तांबे पाटील, हुसेन दलवाई, माजी महिला प्रदेश अध्यक्षा ॲड. चारुलता टोकस ,धवलसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, आदि उपस्थित होते. जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटील