बार्शी शहर व तालुक्यात एका दिवसात सापडले 36 कोरोना रुग्ण, दोघाचा मृत्यू ; दुय्यम कारागृहातील 11 कैदी ही पॉझिटिव्ह
बार्शी शहरात सांयकाळ पर्यंत बार्शी वैराग येथील सहा जण कोरोना पॉझिटिव्ह आले आले .एवढ्यावरच न थांबता रात्री उशिरा आलेल्या अहवालात तब्बल 30 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ निर्माण झाली आहे. यामध्ये वैराग येथील दोघांचा मृत्यू झाला आहे. ही माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ संतोष जोगदंड यांनी दिली.यामध्ये 11 कैद्यांचा समावेश आहे.

रात्री उशिरा आलेल्या अहवालात बार्शी सब जेल मधील 10 कैदी, माढा तालुक्यातील रिधोरे व भोसरे येतील प्रत्येकी एक, बार्शी शहर 10 , वैराग 11 ,साकत पिंपरी 2 , असे एकूण 30 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दुःखद बातमी म्हणजे वैराग येतील दोघाचं मृत्यू झाला आहे. यामुळे शहर व तालुक्यातील एकूण बधितांचा आकडा हा 94 झाला आहे.
बार्शी शहरातील एकुण 19 अहवाल प्राप्त अजुन त्यांपैकी 01 अहवाल निगेटिव असुन 18 अहवाल पोझिटिव्ह आले आहेत. त्याचा तपशील खालील प्रमाणे आहे.


नाळे प्लॉट, बार्शी 01, मंगळवार पेठ, बार्शी 01, उपळाई रोड, माजी 01, आदर्श नागार नागणे पाट वाशी 03, संकेश्वर भवन, कसबा पेठ बार्शी 01, सबजेल तबसील कार्यालय बाशी 11 असे एकुण 18 अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत.
वैराग येथील एकुण 08 स्वॅब अहवाल प्राप्त असुन 08 अहवाल पॉझिटिव आलेले आहेत. त्याचा तपशील खालील प्रमाणे आहे.

गवंडी गल्ली वैराग 01, परीट गल्ली 02. न्यु चाटी गल्ली 01, संतनाथ गल्ली वैराग 02, शारदादेवी नगर 02 असे एकुण 08 अहवात पॉझिटिव आले आहेत.
साकत पि. येथील 02 स्वॅब अहवाल प्राप्त जगुन 02 अहवाल पॉझिटिव आलेले आहेत.रिढोरे व भोसरे येथील प्रत्येकी एक पॉझिटिव आलेले आहेत. सदरील दोन्ही बाधित व्यक्ती बार्शी शहरातील खाजगी हॉस्पिटल उपचार घेत आहेत. उंबरगे 01, जवळा बुर्द ता. कळंब 01 असे एकुण 02 अहवाल निगेटिव आले आहेत.
