बार्शीत निवृत्त शिक्षिकेचे बंद घर फोडले; पावणे तीन लाखाचा ऐवज लंपास
गणेश भोळे
बार्शी: येथील अलीपुर रोड गोली वडापाव दुकाना समोर राहणाऱ्या वयोवृद्ध निवृत्त शिक्षिका घर बंद करून अडीच महीन्यापूर्वी मुलीकडे गावाला गेले होत्या या दरम्यान अज्ञात चोरट्यांने बंद घराचा कडी कोयंडा तोडुन कपाटातील लाँकरमधील साडे ५ तोळे सोन्याच्या दागिण्यासह कपाटातील साड्या, रजई चादरी व गॅस सिलेंडर असे घरगुती साहीत्य ही चोरट्याने पळविल्याची घटना घडली.


याबाबत सुशिला रामचंद्र पवार (वय ८१) या वयोवृद्ध निवृत शिक्षिकेने शहर पोलीसात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत म्हटले की सुशिला पवार या ५ मार्च २०२१ रोजी घरबंद करुन कुलूप लावून आपल्या पुतण्यासह सोलापुर येथे मुलीकडे गेल्या होत्या. यावेळी सोन्याचे दागिने घरातील कपाटाच्या लॉकर मध्ये ठेवले होते. मुलीकडे दोन महीने रहिल्यानंतर नातू व्यंकट सोमवंशी याने वयोवृद्ध शिक्षेकेस त्यांचे दुसऱ्या मुलीकडे कुर्डुवाडी येथे राहण्यास आणले . यावेळी त्यांनी बार्शी येथील राहत्या घराची साफ सफाई करण्यासाठी घराच्या चाव्या नातु व्यंकट याचेकडे दिल्या.
त्यानंतर व्यंकट हा मंगळवारी दि १५ जुन रोजी बार्शी येथे साफसफई साठी आला असता त्यावेळी लाकडी दरवाज्याचा कडी कोयंडा उचकटलेला दिसला , आत जाऊन पाहीले असता पाठीमागील शटरचे , बेडरूमचे कुलुप तोडलेले दिसले. .कपाट उघडे व आतिल सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले . किचन मधील गॅस सिलेंडर टाकी ही दिसुन न आलेने घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. हि बाब व्यंकट यांने फिर्यादी यांचे मुलगा राजेंद्र यास कळविले. राजेंद्र यांनी व्यंकट यास चोरीची घटना पोलीस स्टेशन कळविण्यास सांगितले.
त्यावरून व्यंकट हा दि.१५ जुन रोजी पोलिस ठाणेस आला होता. मात्र चोरीस कोण कोणत्या वस्तु गेल्या हे माहीत नसल्याने दि. १९ जुन रोजी सुशिला पवार यानी सविस्तर फिर्याद दिली. यामध्ये १५ ग्रॅम वजनाचे मनी मंगळसुत्र , ५ ग्रॅम वजनाच्या सहा पिळ्याच्या आंगठ्या, ५ ग्रॅम वजनाचे कर्ण फुले असे साडेपाच तोळे सोन्याचे दागिणे व १० साड्या ,१ शाल , ५ सोलापुरी चादरी , २ रजई व १ गॅस सिलेंडर टाकी असे घरगुती साहीत्य चोरट्यांने पळविले अधिक तपास शहर पोलीस करित आहे .