भाजपच्या बार्शी शहरअध्यक्षपदी महावीर कदम तर तालुकाध्यक्षपदी मदन दराडे

0
291

भाजपच्या बार्शी शहरअध्यक्षपदी महावीर कदम तर तालुकाध्यक्षपदी मदन दराडे

वैराग ब्लॉकची जबाबदारी शिवाजी सुळेंवर

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

बार्शी: भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम राज्यभर सुरु आहे . त्यानूसार बार्शी तालुक्यातील निवडी नूतन जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी जाहीर केल्या आहेत़ यामध्ये बार्शी शहर अध्यक्षपदी महावीर कदम,तालुकाध्यक्षपदी जि.प. मदन दराडे तर वैराग शहर अध्यक्षपदी शिवाजी सुळे यांची निवड करण्यात आली आहे .


भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी पंढरपूर येथील विठ्ठल मंदीरासमोर नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले . यावेळी नगरसेवक विजय राऊत, नगरसेवक संदेश काकडे, व पदाधिकारी उपस्थित होते .


महावीर कदम, शिवाजी सुळे व मदन दराडे या तीन्ही पदाधिकाऱ्याचा लक्ष्मी सोपान बाजार समिती येथे आ.राजेंद्र राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ यावेळी माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, नगराध्यक्ष आसिफ तांबोळी, पंचायत समितीचे सभापती अनिल डिसले, माजी जि़प़ सदस्य संतोष निंबाळकर आदी उपस्थित होते .


यावेळी बोलताना राजेंद्र राऊत म्हणाले की, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष श्रीकांत देखमुख यांनी नूतन पदाधिकाऱ्यांवर टाकलेली जबाबदारी ते निश्तिपणे पार पाडून पक्षाचे काम तळागाळापर्यंत पोहचवतील असा विश्वास व्यक्त केला.

आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवून आ़ राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली शहर व तालुक्यात पक्ष बळकट करु असे सांगीतले . आ . राजेंद्र राऊत हे गेल्या तीन वर्षापासून भाजपामध्ये कार्यरत आहेत़ विधानसभा निवडणुक त्यांनी अपक्ष लढवली होती.त्यानंतर पहिल्यांदाच राऊत गटांच्या कार्यकर्त्यांना संधी दिली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here