बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती उभारणार १०० बेडचे कोवीड केअर सेंटर; चेअरमन रणवीर राऊत

0
373

बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती उभारणार १०० बेडचे कोवीड केअर सेंटर; चेअरमन रणवीर राऊत

सोलापूर; बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने १०० बेडचे कोवीड केअर सेंटर उभारण्यात येणार असुन त्यासाठी संचालकांची तातडीची बैठक ३० एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती चेअरमन रणवीर राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी बाजार समितीचे संचालक रावसाहेब मनगिरे उपस्थित होते.यासाठी बार्शी केमिस्ट असो. ना नफा ना तोटा तत्वावर औषधें देणार आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

यावेळी संचालक रावसाहेब मनगिरे,असो. चे अध्यक्ष सुधीर राऊत जिल्हा कार्यकारिणी सदस्य अभिजित गाढवे उपस्थित होते.

कृषि उत्पन्न बाजार समिती,बार्शी चे कार्यक्षेत्र हे संपूर्ण बार्शी तालुका हे आहे. बार्शी
तालुक्यात सध्या कोरोना (कोव्हीड-१९) या विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे
सदर विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत.

तरी देखील सदर उपाय योजना अपुऱ्या पडत आहेत.
बार्शी शहर व तालुक्यात दररोज किमान ५ ते १० रुग्ण मृत्यूमुखी पडत आहेत. तसेच बार्शी शहर व तालुक्यात दिवसेंदिवस रुग्णंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच शेजारील उस्मानाबाद जिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी बार्शीमध्ये येत असलेमुळे बार्शी शहरात व ग्रामीण
भागात रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर, औषधे व इंजेक्शन इत्यादी सुविधापुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने अनेक लोकांना जीव गमवावा लागत आहे.

अशा गंभीरपरिस्थितीत राज्य शासनाच्या
आवाहनानुसार कोरोना (कोव्हीड-१९) या विषाणूचा प्रादुर्भाव
रोखणेसाठी, रुग्णांना तातडीने उपचार मिळावा या उद्देशाने व आवश्यक त्या सोयी मोफत उपलब्धकरुन देण्यासाठी बाजार समितीने पुढाकार घेतला आहे.बार्शी बाजार समितीचे फळे भाजीपाला विभागातील सेल हॉल स्व:ताच्या मालकीचे १०,०००, चौ.फुट इतक्या क्षेत्रफळाचे आहे. फळे व भाजीपाला मार्केट सध्या बंद आहे. सदर जागेत १००
बेडचे कोव्हिड सेंटर उभारणेची क्षमता असल्याने सदर ठिकाणी कोव्हिड सेंटर सुरु करता येईल.

सदर ठिकाणी कोव्हिड सेंटर सुरु केल्यास बार्शी शहरातील व तालुक्यातील शेतकरी, गरीब रुग्ण,हमाल, तोलार, श्रमिक कामगार यांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
बाजार समितीच्या वतीने कोव्हिड सेंटर सुरु करणेसाठी १०० बेड, १०० गाद्या, २०० बेडशीट, २०० उशीखोळ, २०० चादरी व कोव्हिड सेंटरसाठी लागणारे इतर साहित्य खरेदी करावे
लागणार आहे. तसेच सदरचे कोव्हिड सेंटर सुरु केल्यानंतर सदर ठिकाणची साफ सफाई करणेसाठी सफाई कामगार तसेच साफसफाईसाठी लागणारे साहित्य व सॅनिटायझेशनसाठी सॅनिटायझर, हॅन्डवॉश, फिनेल, अॅसीड, मास्क, पल्स ऑक्सिमीटर, थर्मा मीटर, सोडियम
हायपोक्लोराईड तसेच कोव्हिड सेंटरच्या अनुषंगाने लागणारे इतर साहित्य खरेदी करावे लागणार
आहे.

तसेच सदर कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी भरती होणाऱ्या रुग्णासाठी, औषधे, पाणी, चहा,नाष्टा, जेवण व इतर अनुषंगिक आवश्यक त्या सुविधा कराव्या लागतील. तसेच सदर ठिकाणी बाजार समितीची १५ शौचालये आहेत.
तरी बाजार समितीच्या वतीने बाजार समितीच्या फळे भाजीपाला मार्केट येथे कोव्हिड सेंटर
सुरु करणेसाठी बाजार समितीने दि.३०/०४/२०२१ रोजी बाजार समितीमध्ये संचालक मंडळाची
तातडीची सभा बोलविलेली आहे.

सभेमध्ये कोव्हीड सेंटर उभारणीच्या विषयास सभेमध्ये मंजूरी
घेवून कोव्हीड सेंटर उभारणीच्या खर्चाच्या मंजूरीचा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक सहसंस्था,सोलापूर यांचे मार्फत पणन संचालक, पणन संचालनालय पुणे व महाराष्ट्र शासनाकडे
पाठविणेत येणार आहे व मंजूरी नंतर कोव्हीड सेंटरची उभारणी केली जाणार आहे. अशी माहिती
सभापती रणवीर राऊत यांनी दिली.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here