विवाहीतेचा छळ प्रकरणी सासरच्या लोकांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल
बार्शी पतीचे अनैतिक संबंध असल्याचे घरी सांगितल्यानंतर तसेच व्यवसायासाठी माहेरहून ५ लाख रूपये आण म्हणून विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह, सासू, सासरा, दीर, जाऊ, नणंद आदींविरोधात बार्शी शहर पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे.

फातीमा मोहसीन बागवान रा. खाटीक गल्ली, बारामती हल्ली राऊळ गल्ली, बार्शी यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. मोहसीन बशीर बागवान, सासू सलिमा बशीर बागवान, दीर असिफ बशीर बागवान, जाऊ सना आसिफ बागवान, नणंद रोजीना रियाज बागवान, ओवेज रियाज बागवान, सर्व रा. खाटिक गल्ली बारामती, नणंद रईसा अस्लम बागवान, रिजवाना गफार बागवान, रूबीना मंजूर बागवान सर्व रा. सातारा, मिनाज जुबेर बागवान रा. दर्गा रोड सुपा ता. बारामती अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. दि. २८ एप्रिल २०१७ च्या एक महिन्यानंतर ते दि. २२ डिसेंबर २०१९ च्या दरम्यान छळ झाल्याचे म्हटले आहे.

पतीचे एका मुलीशी प्रेम संबंध असल्यामुळे मी माझे पती मोहसीन याचे सोबत नांदू नये तसेच व्यवसायासाठी पाच लाख रूपये न दिल्याने संबंधितांनी शिवीगाळी, दमदाटी, वेळोवेळी मारहाण करून शारिरीक व मानसिक छळ केला अशा आशयाची फिर्याद फातीमा यांनी दिली आहे. अधिक तपास पोना शबाना कोतवाल करित आहे .
