बार्शी ग्रामीणचे पोलीस शिपाई रामेश्वर मोहिते यांचं निधन

0
7734

बार्शी ग्रामीणचे पोलीस शिपाई रामेश्वर मोहिते यांचं निधन

बार्शी – बार्शी तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस शिपाई रामेश्वर मोहिते यांचे आज विजेच्या धक्क्याने दु:खद निधन झाले. ते चिखली ता.जि उस्माबाद येथील रहिवाशी होते. सध्या ते बार्शी तालुका पोलिस ठाणे येथे कार्यरत होते. त्यांच्या गावाकडील शेतात ही दुर्घटना घडली.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

रामेश्वर मोहिते त्यांच्या प्रेमळ व मनमिळावू स्वभावाने प्रचलित होते. ५ महिन्यापूर्वी त्यांचा विवाह झाला होता. रामेश्वर मोहिते यांच्या जाण्याने संपूर्ण चिखली गावावर शोककळा पसरली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here