बार्शी: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कृषी महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

0
174

बार्शी: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कृषी महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

बार्शी: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने बाजार समितीच्या आवारात 9 ते 13 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाची तयारी अंतिम टप्यात आली आहे. कृषी प्रदर्शनाच्या स्टाॅल उभारणीच्या कामाची बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत यांनी पाहणी केली.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

जास्तीत जास्त शेतकरी व नागरिकांना कृषी महोत्सवाचा लाभ घेता यावा यासाठी हा महोत्सव एकूण ५ दिवस चालणार आहे. जिरायती,बागायती पिकांबरोबरच प्रयोगशील शेतीदेखील डोळ्यासमोर ठेवून प्रदर्शनामध्ये तश्या प्रकारच्या कंपन्या सहभागी झालेल्या आहेत.

रणवीर राऊत यांनी स्टाॅल उभारणी,पाणी व स्वच्छता व्यवस्था या चालू असलेल्या कामाची पाहणी केली.हा कृषी महोत्सव दि.०९ ते १३ नोव्हेंबर दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानावर होत असून यावेळी कृषी प्रदर्शनाबरोबरच कृषी औजारांच्या प्रात्यक्षिकांसाठी विशेष क्षेत्र,देशी गायींचे प्रदर्शन,लघुउद्योग क्षेत्रातील उद्योगांचे विशेष दालन व महिला बचत गटांचे विशेष दालन,३०० पेक्षा जास्त स्टाॅल,पिक स्पर्धा व पारीतोषिके,विशेष चर्चासत्रे,डाॅग शो तसेच विविध कृषी उपयोगी साधने यांचा समावेश क्सकरण्यात आला आहे.

यावेळी संचालक रावसाहेब मनगिरे , माजी नगरसेवक दिपक राऊत, विजय चव्हाण , भैय्या बारंगुळे, रोहित लाकाळ,उद्योजक दिपक तलवाड,माधवराव देशमुख,किरण कोकाटे ,मुकुंद यादव तसेच इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here