बापरे: बार्शी तालुक्यात शनिवारी रात्री आढळले ६५ पॉझिटिव्ह रुग्ण ; एकुण संख्या पोहचली – ७४६ वर

0
363

बापरे: बार्शी तालुक्यात शनिवारी रात्री आढळले ६५ पॉझिटिव्ह रुग्ण ; एकुण संख्या पोहचली – ७४६ वर

तर आज १०१ रुग्ण झाले कोरोना मुक्त

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

बार्शी :बार्शी तालुक्यात गेल्या काही दिवसात जलद गतीने रुग्णांची वाढ होत असताना आज शनिवारी आलेल्या अहवालत १०१ रुग्ण ही कोरोना मुक्त झाल्याची  सुखद बातमी आली . तर आलेल्या रिपोर्ट मध्ये ६५ रुग्ण कोरोना बाधित आले आहे .


बार्शी शहरासह तालुक्यात कोरोना बाधितांची आकडा वाढतोय आज २६८ जणांचा अहवाल आला त्यापैकी अलीपुर रोड परिसरात १० रुग्ण लोकमान्य चाळ १ ,वाणी प्लॉट ४, मलीक चौक -१, पाटील प्लॉट १ ,सावळे गल्ली १ ,नाळे प्लॉट – १,मांगडे चाळ -१ ,

नपा शाळा ( क्र ३ ) – १ ,लोखंड गल्ली १ ,भवानी पेठ ४ ,आडवा रस्ता २ , भोगेश्वरी मंदीर -३, हिरेमठ प्लॉट आगळगाव रोड -४, नाईकवाडी प्लॉट १ ,कासारवाडी रोड -१ असे ३७ जण पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहे .


 तर ग्रामिण मध्ये वैराग येथे ८ जण पॉझिटिव्ह रुग्ण जामगाव येथे ९ रुग्ण तर इर्ले – ४, हळदुगे – ४  रुग्ण . तर सर्जापुर , धोत्रे ,सासुरे या तिन्ही गावात प्रत्येकी १  असे २८ रुग्ण बाधित सापडले आहे. सध्या ३९९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत तर आतापर्यत ३२४ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे .

आजवर २३ मयताची नोंद झाली आहे . आज अखेर ७९ स्वब अहवाल प्रलंबीत असल्याची माहीती तालुका वैदयकिय अधिकारी डॉ . संतोष जोगदंड यांनी दिली .

बार्शी तालुक्यात विविध व नवनवीन भागात कोरोनाचा शिरकाव वाढत असुन यामुळे कोरोना बाधितांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होताना दिसुन येत आहे लॉक डाऊनच्या काळातही रुग्न संख्या कमी होता नसल्याने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरणआहे .


Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here