बापरे :बार्शीत १४४ कोरोना रुग्ण सापडले
बार्शी : मागील काही दिवसापासुन बार्शी शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळुन येत आहे. बुधवार दि ९ रोजी प्राप्त अहवालात एकाच दिवशी तब्बल १४४ रूग्णांची भर पडल्याने नागरीकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

बार्शी शहरात सदया कोरोनाचे बाधित रुग्णांत झपाट्याने वाढ होत असल्याने शहरातील विविध भागात कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे.

बार्शी तालुक्यात आजवर ३०७१ कोरोना बाधित रुग्ण सापडले असुन त्यापैकी २१५५ रुग्ण बरे झाले आहे . सदया गृहविलगीकरणात ५६९ रुग्ण तर २३८ बाधित रुग्ण उपचार घेत आहे. तर आजपर्यंत १०९ रुग्ण मयत झाल्याची नोंद झाली आहे.

दि. ९ रोजी प्राप्त अहवाल बार्शी शहरात १०९ तर ग्रामिण भागात ३५ रुग्ण आढळले आहे.