बाळासाहेब कोरके सह मुख्याध्यापक यांचे चारही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
बार्शी :
माध्यमिक आश्रम शाळा जामगाव तालुका माढा येथील शिक्षकांचे व इतर 1कामासाठी कर्मचाऱ्यांचे जून २०१० एप्रिल २०१३ थकित वेतन बिलाची रक्कम रुपये ३८ लाख ८२ हजार ५१८ हे शासनाने खात्यावर जमा करूनही ती रक्कम मुख्याध्यापक पांडुरंग महादेव कानगुडे यांनी ज्या त्या कर्मचारी यांच्या खात्यावर जमा न करता स्वतः चेकने दहा लाख रुपये काढले व संस्थेचे सचिव बाळासाहेब कोरके यांचे खात्यावर रुपये २८ लाख ८२ हजार ५१८ रुपये ट्रान्सफर आरटीजीएस ने केले .

सदर थकीत वेतन बाबत कर्मचारी यांनी वारंवार तक्रारी व मागणी करूनही थकित वेतन मुख्याध्यापक व सचिव यांनी दिले नाही . उलट मुख्याध्यापकांनी खोटी बिले, कागदपत्र बनवून कर्मचारी यांनी कोणतीही सोसायटी घेतली नसताना सोसायटी कर्ज पगार बिलात दाखवून सदरची रक्कम हडप केली.

त्यानंतर कर्मचारी हरी पोटभरे, समाधान हजारे, शिवाजी घुगे, हनुमंत क्षिरसागर व इतरांनी वरिष्ठांकडे तक्रार केली . सदर तक्रारीची दखल घेऊन उपसंचालक पुणे प्रादेशिक यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली व सदर समितीसमोर मुख्याध्यापक पांडुरंग कानगुडे व सचिव बाळासाहेब कोरके यांनी ४ मार्च दोन हजार वीस लाख ३८ लाख ८२हजार ५१८ रुपये त्यांनी घेतल्याची लेखी देऊन मान्य केले . त्यानंतर सदर कर्मचाऱ्यांनी मुख्याध्यापक व सचिव यांना वारंवार थकीत वेतनाची मागणी केली .
मात्र याची दोघांनीही दखल घेतली नाही. त्यानंतर प्रहार संघटनेचे संजीवनीताई बारंगुळे यांचेमार्फत बराच पाठपुरावा केला तरीही थकित वेतनची रक्कम दोघांनीही दिली नाही नंतर कर्मचारी माढा पोलिसात डीवायएसपी बार्शी, एसपी सोलापूर यांच्याकडे रितसर तक्रार दिली. मात्र त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही म्हणून वरील चारही कर्मचारी यांनी अॅड आर वैद्य बार्शी यांचे मार्फत फौजदारी कोर्टात फिर्याद दाखल केली व माला न्यायालयाने न्यायाधीश गित्ते यांनी पोलिसांना चार वेगवेगळे गुन्हेसीआरपीसी कलम १५६ ,८३प्रमाणे भादवि कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, ४०६, ४०९, ३४ प्रमाणे दाखल करण्याचे आदेश दिले याप्रमाणे माळा पोलीस ठाण्यात चार वेगळे गुन्हे दाखल झाले आहेत.
त्या चारही गुन्ह्यात अटक पूर्व जामीन मिळण्यासाठी चार वेगळे अर्ज त्यांनी कोर्टामध्ये दाखल केले होते ते चारही अटकपूर्व जामिन अर्जआज रोजी बार्शी जिल्हा व सत्र न्यायाधीश आर एस पाटील यांची यांनी फेटाळले आहे सदर चार्य प्रकरण सरकार तर्फे अँड डी डी देशमुख व मूळ फिर्यादी एडवोकेट वैद्य यांनी काम पाहिले कोर्ट पैरवी कोकाटे यांनी केली